पश्चिम महाराष्ट्र

'एमपीएससी'च्या अर्धवट पॅनलमुळे भावी फौजदारांची 'परीक्षा'

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील पाचपैकी तीन सदस्यांच्या रिक्‍त पदांमुळे (एमपीएससी) दीड वर्षांपूर्वी पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊनही भावी फौजदारांची मैदानी परीक्षा संपलेली नाही. त्यासाठी आता आणखी एक महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, तत्कालीन सरकारने नव्या सदस्यांसाठी अर्ज मागविले. मात्र, निवडणुकीमुळे त्यांचीही निवड रखडली. त्यामुळे प्रशासकीय सेवेत दाखल होण्यापूर्वीच त्यांना प्रतिक्षेची 'परीक्षा' द्यावी लागत आहे. 

प्रशासनाच्या माध्यमातून लोकहिताची कामे करुन समाज विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भावी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील रिक्‍त पदांमुळे नियुक्‍तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. पोलिस, महसूलसह अन्य महत्त्वाच्या खात्यातील अधिकाऱ्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पॅनलच्या माध्यमातून होते. त्यासाठी पाच सदस्य असणे आवश्‍यक आहे. मात्र, मागील दीड वर्षांपासून दोनच सदस्यावर आयोगाचे कामकाज सुरु आहे. आयोगाच्या अध्यक्षपदी सतीश गवई तर एकमेव सदस्य म्हणून दयानंद मेश्राम काम पाहत आहेत. शासनाकडे दोनवेळा पत्रव्यवहार करुनही अद्याप सदस्यांची नियुक्‍ती झाली नाही. तत्पूर्वी, शासकीय जाहिरातीनुसार सुमारे 90 हून अधिक अर्ज सदस्यपदासाठी प्राप्त झाले. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे निवडीसाठी वेळच मिळाला नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने अथक मेहनत करुन चांगले गुण घेऊन लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मागील दीड वर्षांपासून मैदानी परीक्षा व मुलाखतीसाठी वाट पाहावी लागत आहे. 

ठळक बाबी... 

  • 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मिळाले नाहीत तीन सदस्य 
  • 'पीएसआय'च्या लेखीत परीक्षेत उत्तीर्ण होऊनही वर्षापासून होईना मैदानी परीक्षा 
  • वर्षाच्या प्रतीक्षेतनंतरही मैदानी परीक्षेसाठी आणखी लागणार एक महिन्याचा अवधी 
  • 2019 मध्ये परिक्षा झालेल्या उमेदवारांना कटऑफची प्रतिक्षा 
  • अनपेक्षित सत्तांतरामुळे अर्ज मागवूनही रखडली नव्या सदस्यांची प्रक्रिया 
  • नव्या मुख्यमंत्र्यांच्या होकारानंतरच होणार नव्या निवडी : अर्जदार सदस्य निवडीच्या प्रतीक्षेत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT