factory
factory 
पश्चिम महाराष्ट्र

साडेसहा लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : आवताडे

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरीही हुमणी रोगाच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडल्याने त्यांना शासकीय मदतीची गरज असून सभासदांच्या विश्‍वासाला पात्र ठरलेल्या दामाजीला पुन्हा ऊस घालण्याचे आव्हान करत चालु हंगामातही साडेसहा लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे असल्याचे चेअरमन मा.समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.

श्री संत दामाजी सहकार साखर कारखान्याच्या 26 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन प्रदिपन रामचंद्र वाकडे व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई, भुजंगराव पाटील, मनोहरपंत धोंगडे, आबासो  बेदरे, बाबासो पाटील, मंदाकिनी बिराजदार, मंगल दुधाळ या माजी संचालकाच्या हस्ते पार पडला. सत्यनारायण महापूजा संचालक राजेंद्र सुरवसे व त्यांच्या सुविद्य पत्नी राधा या यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, सभापती प्रदिप खांडेकर, समाजकल्याण सभापती शिला शिवशरण, मार्केट कमिटीचे सभापती सोमनाथ आवताडे, जि.प.सदस्य दिलीप चव्हाण, चंद्रकांत पडवळे, पं.स.सदस्य सुर्यकांत ढोणे, बिरा कोळेकर लक्ष्मण म्हस्के, सुधाकर मासाळ, सुहास पवार, गणेश गावकरे,विनोद लटके, संतोष कवडे, वर्क्स मॅनेंजर सुहास शिनगारे, प्र.चिफ केमिस्ट मोहन पवार, लेबर ऑफिसर नेताजी रणवरे, प्र.चिफ अकौंटंट- रमेश गणेशकर, शेतकी अधिकारी- ढेरे, कार्यालय अधिक्षक सिध्देश्वर गोवे, कामगार संघटनेचे विठ्ठल गायकवाड, कामगार पतसंस्थेचे उत्तम भुसे, शेतकरी, सभासद, इतर अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष आवताडे म्हणाले की सभासदांची आर्थिक उन्नतीसाठी जेष्ठ संचालक बबनराव आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ कामकाज करत असताना अत्यंत काटकसर, पारदर्शकता, चिकाटी ठेवलेली असून असे मत दामाजी कारखान्याचे चेअरमन मा.समाधानदादा आवताडे यांनी व्यक्त केले.

कारखान्याची टेक्नॉलॉजी ही 28 वर्षांपूर्वीची जुनी असुन आज सर्वांनी पाहिले तर यामध्ये काहीही नवीन बदल झाल्याचे सर्वांचे निदर्शनास येत आहे.  परंतु कामगारांच्या व संचालक मंडळाच्या सहकार्याने सुधारीत टेक्नॉलॉजी कार्यान्वीत करुन सर्व कामगारांची व शेतकर्‍यांची आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील आहे. चालु हंगामामध्ये रिकव्हरी जास्तीत जास्त रहाणेसाठी कामगारांनी प्रयत्न करावेत. यावेळी दत्तात्रय जमदाडे, प्रा.येताळा भगत यांची भाषणे झाली प्रास्ताविकात कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी केले. उपस्थितांचे आभार संचालक सचिन शिवशरण यांनी मानले.

कारखाना उभारणीसाठी तळमळीने झटलेल्या माजी संचालकाचा काळाच्या ओघात विसर पडला समाधानच्या संकल्पनेतुनच आम्हा संस्थापक संचालकांच्या हातुन बॉयलर अग्निप्रदिपन व कृतज्ञता सोहळयाचे आयोजन करुन एक कारखानदारीत नवा आदर्श घडवला आहे.
- मनोहर धोंगडे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT