पश्चिम महाराष्ट्र

बागेवाडीत सर्वधर्मीय बांधतात "ताबूत' !  मोहरम निमित्त मिरवणूक व विसर्जन

सकाळ वृत्तसेवा

फलटण शहर ः बरड (ता. फलटण) येथील बागेवाडीत हिंदू बांधवांनी मोहरमनिमित्त ताबूत तयार केले असून, उद्या (ता. दहा) ताबूताची मिरवणूक काढून मोहरम उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. 

फलटणपासून 18 किलोमीटरवर आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील बरड ग्रामपंचायती अंतर्गत सुमारे 1200 लोकसंख्या असलेल्या बागेवाडीत मुस्लिम बांधवांचे एकही कुटुंब नसताना मोहरमनिमित्ताने हिंदू बांधव पूर्वापार "ताबूत' तयार करून, त्याची पूजा करून दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढून उत्सव साजरा करतात. मिरवणुकीत गावातील तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले सहभागी होतात. पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवणूक काढण्यात येते. पाच-सहा गावांतील नागरिक उपस्थित राहतात. काही भाविक नारळाची तोरणे बांधतात तर काही ताबूत बांधतात. दरवर्षी नारळांच्या तोरणांच्या संख्येत वाढ होत आहे. तोरणासाठी जमलेले नारळ विक्री न करता दुसऱ्या दिवशी प्रत्येक घरी प्रसाद म्हणून वाटप करण्यात येते. ताबूत मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढून नंतर ताबूत विर्सजन करण्यात येते. उत्सवात बागेवाडीतील रामोशी, मराठा, माळी, धनगर समाजातील सर्व समाजबांधव सहभागी होतात. ताबूत उत्सव साजरा करण्यात येत असल्यामुळे कोणत्याही अनर्थ घटना गावात घडत नाहीत. गावची दिवसेंदिवस प्रगती होत आहे, अशी ग्रामस्थांची श्रध्दा आहे. त्याप्रमाणे ताबूत तयार करण्यात आले आहेत. उद्या (ता. दहा) मिरवणूकीने ताबूताचे विसर्जन करण्यात येणार आहे. 
 

ताबूतचा मान पिराजी शिंदेंकडे 

ताबूताचा मान गावातील पिराजी भैयाजी शिंदे यांच्याकडे आहे. ते 90 वर्षांचे असून त्यांच्या अगोदर त्यांच्या वडिलांकडे हा मान होता. त्यांच्या घराण्यात गेल्या अनेक वर्षांपासून हा मान आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT