bane.jpg
bane.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

काेल्हापूर : प्रा. विठ्ठल बन्ने यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : येथील देवदासी चळवळीचे जेष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते प्रा. विठ्ठल बन्ने यांचे आज पहाटे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर कोल्हापुरात खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 

१९७५ मध्ये ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे यांच्यासमवेत प्रा. बन्ने यांनी देवदासी चळवळीत उडी घेतली. देशातील पहिली देवदासी परिषद त्यांच्या पुढाकाराने गडहिंग्लजमध्ये झाली. अनेक वर्षच्या लढ्यानंतर शासनाने देवदासी प्रतिबंध कायदा केला. त्या कायद्याच्या अंमलबाजावणीसाठीही त्यांनी आंदोलने केली.

देवदासींना न्याय मिळवून देण्यात बन्ने यांचे योगदान मोठे आहे. याशिवाय त्यांनी भटक्या जमातीसाठी रस्त्यावर उतरून त्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. त्यांना न्याय मिळवून दिला. अशा या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्याच्या निधनाने गडहिंग्लजच्या सामाजिक चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT