Teacher
Teacher 
पश्चिम महाराष्ट्र

तास न घेणाऱ्या प्राध्यापकांना घरचा रस्ता

तात्या लांडगे

सोलापूर - विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे कारण पुढे करीत काही महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) कडक भूमिका घेत सर्वच महाविद्यालयांमधील तास, अभ्यासक्रम व विद्यार्थ्यांची हजेरी पडताळणी करण्याचे निर्देश विद्यापीठांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. वेळापत्रकानुसार तास अथवा अभ्यासक्रम पूर्ण न करणाऱ्या प्राध्यापकांना थेट घरचा रस्ता दाखविण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

राज्यातील विद्यापीठाअंतर्गत उच्च शिक्षण देणाऱ्या पाच हजार 500 महाविद्यालयांपैकी एक हजार 293 महाविद्यालयांमध्ये वेळापत्रकानुसार तास होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे वेळापत्रकानुसार तास व्हावेत, हजेरीप्रमाणे विद्यार्थ्यांची उपस्थितीत असावी आणि शंभर टक्‍के अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, या तीन बाबींवर लक्ष केंद्रित करून विद्यापीठांनी त्याची वारंवार पडताळणी करावी, असे "यूजीसी'ने स्पष्ट केले आहे. त्यानुसार विद्यापीठांनी युद्धपातळीवर तयारी केली असून, सोलापूर विद्यापीठाने एका महाविद्यालयावर त्यानुसार कारवाईही केली आहे. दरम्यान, वेळापत्रकानुसार कामकाजाला बगल देणाऱ्या महाविद्यालयांची पडताळणी करण्याकरिता विद्यापीठांनी स्वतंत्र पथकांची नियुक्‍ती केली आहे. याचसोबत विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीच्या कारणांचाही शोध घेतला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार आता विद्यापीठाचे अधिकारी महाविद्यालयांना अचानक भेटी देऊन वेळापत्रकानुसार त्याठिकाणी तास होतात की नाहीत, अभ्यासक्रम पूर्ण केला जातोय का, हजेरीप्रमाणे विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे का, या बाबींची पडताळणी करतील.
- डॉ. एस. आय. पाटील, प्र-कुलगुरू, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

महाविद्यालयांना हे नियम बंधनकारक
- अनुदानित अथवा विनाअनुदानित एका तुकडीसाठी दोन प्राध्यापक असावेत
- वेळापत्रकानुसार प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे तास घ्यायलाच हवेत
- हजेरी पुस्तिकेप्रमाणे विद्यार्थ्यांची शंभर टक्‍के उपस्थिती असावी
- वार्षिक नियोजनानुसार संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक
- बीए, एमए, एमबीए यांसह अन्य अभ्यासक्रमांचे तास नियमित घ्यावेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT