vikhe.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

गृहनिर्माण प्रकल्प साेलापूरकरांसाठीच : राधाकृष्ण विखे पाटील

अशोक मुरुमकर

सोलापूर : 'तुमच्यासाठीच हा प्रकल्प आहे. लवकर पूर्ण करा,' असे म्हणत गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिरीक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांना घरांच्या भूमी पूजनाचा मान दिला. सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मात्र यावेळी दांडी मारली.

पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री यांच्या हस्ते एखाद्या प्रकल्पाचे किंवा योजनेची उद्घाटने झालेले आपण पाहिले आहेत. मात्र एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचे अधिकार्याच्या हस्ते भूमी पूजन अपवादात्मकवेळीच होते. सोलापूरात सरकारच्या महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या प्रधानमंत्री आवास विकास योजने अंतर्गत बांधण्यात येणार्या १३ हजार ५०० घरांचे भूमीपूजन गृहनिर्माण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते आज होते.

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सरकारचा अनेक वेगवेगळे निर्णय घेण्याचा धडाका सुरु आहे. त्यातच आज सोलापूरात १३ हजार ५०० घरांचे भूमीपूजन झाले. चार ठिकाणी याचे भूमीपूजन होते. त्यातील पहिले भूमीपूजन कमिशनर आॅफीसच्या पाठीमागे अतुल झेंडे यांच्या हस्ते झाले. विखे पाटील यांनी त्यांना हा मान दिला. यावेळी झालेली पूजा, आरती आणि पहिला टिकाव झेंडे यांनी टाकला.

या कार्यक्रम पत्रिकेवर सहकार मंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती म्हणून नावे होती. परंतु दोघांनीही पहिल्या (कमीशनर अॉफिसच्या मागे) कार्यक्रमाला दांडी मारली. यावेळी गृहनिर्माणचे सह अध्यक्ष राजेंद्र मिरगणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, महापैर शोभा बनशेट्टी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT