baraskar
baraskar 
पश्चिम महाराष्ट्र

मोहोळच्या सर्वांगिण विकासासाठी प्रसत्न करणार - बारसकर

सकाळवृत्तसेवा

मोहोळ - शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रभागात मोठी विकास कामे सुरू आहेत. नागरिकांना येत्या काळात घरबसल्या अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली सुरू करण्यात येणार असुन, नागरिकांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले 

एकोणीस एप्रील हा नगरवीकास दिन मोहोळ नगरपरिषदेत साजरा करण्यात आला. त्यावेळी नगरविकास व नागरिकांच्या अपेक्षा या विषयावर चर्चा सत्र आयोजीत केले होते. त्यावेळी नगराध्यक्ष बारसकर बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष शौकत तलफदार, मुख्याधिकारी कैलास गावडे, डॉ. विनय शहा, डॉ. उमेश झाडबुके, डॉ. प्रमोद पाटील, अॅड. हेमंत शिन्दे, अॅड. कैलास नाईक, नगरसेविका सिमा पाटील, अभियंता लोखंडे आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थीत होते 

यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णालयातील कचऱ्याची समस्या मांडली. कचऱ्याची व्यवस्था नगर परिषदेने करण्याची मागणी त्यांनी केली. हद्दवाढ भागातील नागरीक सर्वात जास्त कर भरतात. मात्र, त्यांनाच सुविधा मिळत नाहीत. गटारी पाणी, विज, रस्ते यांची उपाययोजना करण्याची मागणी अॅड. हेमंत शिन्दे यांनी केली. 

मुख्याधिकारी गावडे यांनी नगरविकासाची कल्पना सविस्तर सांगीतली. तर भविष्यात पाणी वाचविण्यासाठी छतावरील पाणी जमिनीत मुरवीण्याची अट घालुनच बांधकाम परवाने देण्यात येणार असल्याचे सांगीतले. तर नागरिकांना घरबसल्या तेरा प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रभागात घरनिहाय कचरा उचलण्यासाठी सहा घंटागाडया खरेदी करण्यात येणार आहेत. तर कुठल्या प्रभागात किती वाजता घंटा गाडी   येणार आहे, हे चौकाचौकात 'डिसप्ले' व्दारा सांगण्यात येणार आहे. तर घंटा गाडीला जीपीआरएस यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचेही गावडे यांनी सांगीतले.  

सुळेनगर येथील देशमुख यांनी 'बीअरबार'चे दुकान असल्याने सकाळी व सायंकाळी गाडया रस्त्यावरच लावल्या जातात. त्यामुळे महिला व इतरांना जाणे येणे अडचणीचे ठरत असल्याचे सांगीतले. नगर परिषदेत सीसीटीव्ही बसवावेत विद्युत खांबावरील ट्युब काढुन त्या ठिकाणी एलईडी बल्ब बसवावेत. सोलापूरच्या धर्तीवर सुलभ शौचालये व्हावीत. पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे या सह अनेक मागण्या नागरीकांनी केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT