This is the prophecy of this year in the anniversary of Goddam Maharaj 
पश्चिम महाराष्ट्र

गोदडमहाराजांच्या संवत्सवरीत यंदाची ही आहे भविष्यवाणी

नीलेश दिवटे

कर्जत - गोदड महाराज यांच्या संवत्सरीत यंदाच्या वर्षाचे भविष्य वर्तविण्यात आले आहे.हे भाकीत खरे ठरते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यावरून परिसरातील शेतकरी शेतीचे वार्षिक नियोजन करतात.

सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज यांच्या मंदिरात संवत्सरीचे वाचन केले जाते. त्या नुसार आज संचारबंदी असतानादेखील प्रथेप्रमाणे पुजारी, ग्रामस्थ आणि पंच कमिटीच्या अनुमतीने गर्दी टाळीत मोजक्याच पुजाऱ्यासमवेत संत गोदड महाराज मंदिरात पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी संवत्सरीचे वाचन केले.

प्रत्येक वर्षी संवत्सरीचे वाचन ऐकण्यासाठी हजारो भाविक मंदिर परिसरात गर्दी करत असतात. मात्र आज कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गोदड महाराज मंदिरात सर्वांना प्रवेश बंद करण्यात आला.

पाऊस समाधानकारक पण भांडणं

गोदड महाराज यांचे पुजारी हभप पंढरीनाथ काकडे यांनी वाचन केले. इतिहासात असा प्रकार प्रथमच घडला. संवत्सरी वाचनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावर्षी शार्वरी संवत्सर आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर होईल. मात्र, महाराष्ट्रात उशीराने येईल यावर्षी पाऊस चांगला, होईल धान्य व फळे मुबलक प्रमाणात पिकतील, मात्र प्रजेमध्ये शेती व इतर कारणांमुळे मोठ्य प्रमाणावर भांडणे होतील.

रोगराईचा त्रास होईल

रोगराईपासून लोकांना त्रास होईल, चोरा पासून मोठा त्रास होईल, तसेच उंदरापासून रोगराई पसरेल,  तसेच आगीच्या घटनापासून त्रास संभवतो आहे. लोकांची संपत्ती वाढेल. यामुळे लोकांना आनंद होईल, लोकर व लोखंड यांची महागाई वाढेल. 

यंदाचा पाऊस वाण्याच्या घरी

यावर्षी पाऊस वाण्याच्या घरी आहे. यामुळे खंडित वृष्टी होईल पण एकंदरीत पर्जन्यमान समाधान कारक राहील सहा भाग पाऊस नद्या व पर्वतावर होईल तर चार भाग पाऊस भुमिवर पडेल. यावर्षीच्या एकुन नक्षत्रापैकी पुनरवसु, पुष्य, मघा, पुरवा, उत्तरा, चित्रा, स्वाती या नक्षत्रात पाऊस समाधानकारक होईल काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल एकुणच समाधानकारक पाऊस होईल. असे वर्तविण्यात आले आहे.

थेट प्रसारण

या वर्षी कोरोना पार्श्वभूमीवर या संवत्सरी वाचनाचे प्रथमच थेट प्रक्षेपण करण्यात आले या मुळे भाविकांना घर बसल्या ती ऐकण्यास मिळाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT