The proposal of the split corporator will be sent to the Divisional Commissioner; No written reply to the notice 
पश्चिम महाराष्ट्र

फुटीर नगरसेवकांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवणार; नोटिशीला लेखी उत्तर नाहीच 

बलराज पवार

सांगली : महापौर, उपमहापौर निवडणुकीत व्हीप डावलून विरोधकांना मतदान करणाऱ्या भाजपच्या सहा फुटीर नगरसेवकांनी नोटिशीला मुदतीत उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे लवकरच प्रस्ताव दाखल करणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी सांगितले. 

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, अर्पणा कदम, नसीमा नाईक, शिवाजी दुर्वे व आनंदा देवमाने यांनी पक्षाचा व्हीप डावलून कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मदत केली.

यामध्ये आनंदा देवमाने आणि शिवाजी दुर्वे हे गैरहजर राहिले, तर उर्वरित चौघांनी थेट विरोधात मतदान केले. त्यामुळे महापालिकेतील भाजपची अडीच वर्षांची सत्ता संपुष्टात आली. यामुळे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे आणि गटनेते विनायक सिंहासने यांनी या फुटीर नगरसेवकांना गेल्या सोमवारी नोटीस बजावली होती. त्याला लेखी उत्तर देण्याची मुदत सात दिवस होती. मात्र एकाही फुटीर नगरसेवकाने नोटिशीला उत्तर दिले नाही. या नगरसेवकांनी गेले दोन दिवस वकिलांच्या भेटी घेऊन नोटिशीला उत्तर देण्याची तयारी केल्याची चर्चा होती. 

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हणाले,""अद्याप एकाही नगरसेवकाने नोटिशीला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवणार आहे. त्यासाठी आवश्‍यक सर्व कागदपत्रे जमा केली आहेत. तसेच ऑनलाईन मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही महापालिकेकडे मागितले आहे.'' 

ते म्हणाले,""निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यांनी मतदान घेताना प्रत्येक उमेदवाराचे नाव सांगून त्यांच्यासाठी मतदान करणाऱ्या सदस्यांची नावे नोंदली आहेत. शिवाय जे सदस्य गैरहजर होते, त्यांना उपस्थित राहून मतदान करण्यासाठी पाच मिनिटांची वेळही दिली होती. हे सगळे रेकॉर्डिंग आहे. ते विभागीय आयुक्तांना सादर केले जाणार आहे. त्यामुळे या सहा नगरसेवकांवर कारवाईसाठी पक्ष प्रयत्न करणार आहे.'' 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT