agri pump.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

लॉकडाऊन काळात तरी शेतीला दिवसा 12 तास वीज द्या 

सकाळवृत्तसेवा

सांगली- संपूर्ण जग ठप्प असताना बळीराजा मात्र रात्र दिवस जगण्या मरण्याची लढाई लढत आहे. आजही त्याला जीवावर उदार होऊन रात्रीच्या अंधारात शेतीला पाणी पाजावे लागत आहे. राज्याची विजेची मागणी 10 ते 12 हजार मेगावॉटनी घटली आहे. यामुळे शेतीला दिवसा 12 तास वीज पुरवठा करावा, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यात नेहमी 450 मेगावॉटची मागणी आता 220 मेगावॉटवर आली आहे. 


ते म्हणाले,""जगाला जगविनाऱ्या पोशिंद्याला दिवसा जागू द्या आणि रात्री झोपू द्या. निदान या जागतिक महामारीच्या काळात तेवढा तरी दिलासा देण्याची भूमिका मायबाप सरकारने घ्यावी. अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या शेतीला दिवसा वीज पुरवठा केला जात नाही. शेतकऱ्यांना जीवावर उदार होऊन रात्रीच्या अंधारात बॅटरीचा आधार घेऊन विहीर, बोअर याची बटने दाबायला जावे लागते. अनेक शेतकऱ्याकडे बॅटरी ही नाही ही परिस्थिती आहे. 
सध्या कोरोनामुळे पूर्ण राज्यात लॉक डाऊन आहे. सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे विजेची मागणी कमी झाली आहे. राज्याला नेहमी 25 हजार मेगावॉट वीज लागते पण उद्योग आणि व्यवसाय बंद असल्याने ही मागणी केवळ 13 ते 14 हजार मेगावॉट इतकीच आहे. म्हणजेच सुमारे 10 ते 11 हजार मेगावॉट विजेची मागणी कमी झाली आहे.

सांगली जिल्ह्याची मागणी नेहमी 450 मेगावॉट इतकी असते. सध्या ती केवळ 250 मेगावॉट इतकीच आहे. सुमारे 200 मेगावॉट वीज मागणी कमी झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात तरी शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी आहे. शेतकऱ्यावर रात्रीच्या अंधारात प्राणी हल्लेही करतात. अनेक शेतकऱ्यांना त्यामुळे जीवही गमवावा लागला आहे. अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. सर्पदंश, विजेचा धक्का लागूनही अनेक शेतकऱ्यांनी रात्रीच्या अंधारात तडफडून जीव सोडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याची या तावडीतून दिवसा शेतीला वीज पुरवठा करावा, अशी प्रचंड मागणी आहे.

त्याचबरोबर सध्या कोरोनामुळे सर्व व्यवसाय उद्योग बंद आहेत. मात्र शेती व्यवसाय बंद ठेवून चालणार नाही कारण उद्या या संकटातून बाहेर पडल्यानंतर अन्नाशिवाय जग जगू शकणार नाही तसेच सध्याचा भाजीपाला ही अंखंडित राहण्यासाठी योग्य वीज पुरवठा आवश्‍यक आहे. याप्रश्नी माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र, यातून मार्ग निघाला नाही तर या प्रश्नांवर महावितरणची बैठक घेऊन तातडीने मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT