civil.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सिव्हील हॉस्पिटलला तीन व्हेंटीलेटर प्रदान 

सकाळवृत्तसेवा

सांगली- गोरगरीब, गरजू रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्‍यक ती सर्व मदत शासकीय रुग्णालयाला करु अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज दिली. आमदार गाडगीळ यांच्या प्रयत्नातून तीन व्हेंटिलेटर्स सिव्हीलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. 


यावेळी अंजली फौंडेशनचे ट्रस्टी सिद्धार्ध गाडगीळ, महापौर सौ. गीता सुतार, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी उपमहापौर धीरज सुर्यवंशी महिला व बालकल्याण सभापती सौ. नसीमा नाईक व प्रभाग समिती एकच्या सभापती सौ. उर्मिला बेलवलकर, सरचिटणीस शरद नलवडे, गणपतराव साळुंखे, अतुल माने आदी उपस्थित होते. आमदार गाडगीळ म्हणाले, अंजली फौंडेशन, महाबळ मेटल प्रायव्हेट लिमीटेड, सांगली व जीवनज्योत कॅन्सर रिलीफ ट्रस्ट मुंबईच्या माध्यमातून तीन व्हेंटिलेटर्स शासकीय रुग्णालयास दिली आहेत. याशिवाय आमदार फंडातूनही आणखी तीन व्हेंटिलेटर्स देणार आहे. 


अधिष्ठाता नणंदकर म्हणाले, आमदार गाडगीळ यांनी योग्य वेळी मदत केली आहे. सिव्हीलकडील नऊ व्हेंटिलेटर्स बंद होते. ते दुरुस्त करुन घेण्याचे काम सुरु आहे. आता उपलब्ध सहा आणि आमदार गाडगीळ यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या तीन अशा नऊ व्हेंटिलेटर्स चांगला फायदा होणार आहे. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश भोई, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोष दळवी, प्रशासकीय अधिकारी मनोज दाभाडे, आदिसेविका श्रीमती सीमा चव्हाण आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT