Sangli Crime Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : ब्राह्मण समाजाविरोधात चिथावणीखोर वक्तव्य; सांगली पोलिसात तक्रार दाखल

ब्राह्मण सामाजाविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करून धमकी देणाऱ्याविरोधात आज शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

सांगली - ब्राह्मण सामाजाविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करून धमकी देणाऱ्याविरोधात आज शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सांगली शाखा व ब्राह्मण सभा सांगली यांच्या वतीने या माथेफिरू इसमाविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला.

तक्रारी अर्जात म्हटले आहे, की समाज माध्यमावरून एका चॅनलवर मराठा आरक्षण आंदोलनातील काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या. सदर व्हिडिओमध्ये एका अज्ञात इसमाने अख्या ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपून टाकू, अशी जाहीर धमकी दिली.

त्याबरोबरच त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एकेरी शद्बात टीका केली. या व्हिडिओमुळे ब्राह्मण समाजामध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी अग्रही मागणी करण्यात आली.

यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष केदार खाडिलकर, महासंघाचे अध्यक्ष मंगेश ठाणेदार, सभेचे उपाध्यक्ष किशोर पटवर्धन, कार्यवाह श्रीराम वेलणकर उद्योजक रवी भिडे, संदीप सोले, डॉ. भालचंद्र साठे, व्रतेश खाडिलकर, हेमंत फाटक, सुनील कुलकर्णी, विद्याधर दांडेकर, चिंतामणी गुळवणी, योगेश कुलकर्णी, श्रेयस जोशी, शामराव भिडे, नाना फडणीस, चिंतामणी केळकर, धनेश कातकडे, रोहन बिनीवाले, माधव गोडबोले, संजय रुपलग, विजय भिडे यांच्यासह ब्राह्मण समाजातील अनेक समाज बांधव उपस्थित होते. पोलिसानी यावर कायदेशीर कारवाईचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

Heritage sites: बाघ गुंफांच्या भित्तीचित्रांपासून गिन्नौरगडच्या किल्ल्यापर्यंत; चार स्थळांना UNESCOची दखल

Latest Marathi News Live Update : ST बँक कथित घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड; बड्या व्यक्तींवर कारवाईची शक्यता?

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT