Pruning is useful for increasing production Bedakihal sakal
पश्चिम महाराष्ट्र

उत्पादन वाढीसाठी ‘प्रूनिंग’ उपयुक्त ;सुरेश देसाई

कृषिपंडित सुरेश देसाई; एकदल, द्विदल धान्यासह उसाला फायदेशीर

गजानन पाटील

बेडकिहाळ : एकदल, द्विदल पिकांची वाढ अपेक्षित प्रमाणात होत नसून, शेती श्रम, खते, मशागतीचा येणारा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे. येथील कृषिपंडित सुरेश देसाई यांनी अधिक उत्पन्नासाठी प्रूनिंग पद्धत विकसित केली आहे. त्याचे फायदेही चांगले होत आहेत. प्रूनिंगविषयी माहिती देताना देसाई म्हणाले, की आजच्या भौगोलिक स्थितीत जमिनीचा घटणारा कस व एकीकडे वाढणारी लोकसंख्या, पिकांची उत्पादक क्षमता घटली असून कीड, रोगराई वाढलेली आहे. बियाणेही महाग झाले आहेत.

अशा कठीण परिस्थितीत सेंद्रिय शेती व देशी बियाणांचा वापर करून दुप्पट उत्पादनासाठी सूर्यप्रकाशाचा उपयोग करून घेण्यासाठी प्रुनिंग तंत्रज्ञान म्हणजेच ‘पिकांचा विशिष्ट काळात शेंडा खुडून फुटवे वाढवून निरोगी व उत्पादन घेणे होय.’ यामुळे पिकांची अतिरीक्त वाढ रोखली जाऊन अधिक फुटवे येतात. पिकांना सूर्यप्रकाश मिळतो. फुकटच्या सूर्यप्रकाशामुळे दीड ते दोनपट उत्पादन सहज मिळते. यामुळे बियाणांचा वापरही ५० टक्क्यांपेक्षा कमी होतो.

पिकाला मुबलक फुटवे व हवा खेळण्यास उत्तम वाव मिळाल्याने पिकावर कीड, रोगाचे प्रमाण अत्यल्प दिसून येते. सेंद्रिय व देशी वानांतील एकदल, द्विदल धान्य व मसाले पीक व ऊस पिकांना ही उपयुक्त ठरते.

शेतीचा पोत राखण्यासह अधिक उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी प्रूनिंग पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यतः पिकांना अधिक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळणे महत्त्वाचे आहे.

- सुरेश देसाई, बेडकिहाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT