public awareness across the country on behalf of the Hindu organization sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

काय चालत मशिद-मदरशात....

सकाळ वृत्तसेवा

सांगली : जमाअते इस्लाम हिंद संघटनेच्यावतीने देशभरात व्यापक जनप्रबोधनाचा भाग म्हणून मशिद आणि मदरशाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी मोहिम सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील या मोहिमेचा प्रारंभ मिरजेतील बक्करसाब मशिदीतील सद्‌भावना महोत्सवाच्या निमित्ताने झाला. आठवडाभरात सांगली आणि मिरजेतही असे उपक्रम होत आहेत. 

मदरसे आणि मशिदींबाबत दृष्टीकोन
गेल्या काही वर्षात मदरसे आणि मशिदींबाबत सतत नकारात्मक प्रचार झाल्याने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी जमाअते हिंद संघटनेने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मशिदीतील धार्मिक विधी, त्यांचा मराठीत अर्थ समजून सांगणे,अजानचा अर्थ, वजू, नमाज, दुवा म्हणजे नेमके काय? मदरशांमध्ये कोणते धार्मिक शिक्षण दिले जाते, तेथील ग्रंथसंपदा, अभ्यासक्रमाचे स्वरुप आदी समजून सांगण्यासाठी संघटनेने तज्ज्ञांचा चमूच नियुक्त केला आहे.

मशिद-मदरशाची व्यवस्था पाहणाऱ्या स्थानिकांकडून सद्‌भावना समारंभाचे आयोजन करून त्यासाठी सर्व धर्मिय कार्यकर्ते, संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येत आहे. चर्चा विनिमयातून त्यांच्याशी संवाद-प्रश्‍नोत्तरे असे या समारंभाचे स्वरुप आहे. 

भारतीय समाजातील संवाद कमी झाल्यामुळे

"" मशिद परिचय उपक्रम देशव्यापी आहे. सर्व धर्म आणि विचारांच्या नागरिकांसाठी हा खुला कार्यक्रम आहे. मशिद किंवा मदरसे पुर्वीही मुस्लिमेत्तरांसाठी खुले होते मात्र गेल्या काही वर्षात भारतीय समाजातील हा संवाद कमी झाला होता. त्याचे दुष्परिणाम म्हणजे मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांबाबत वाईट प्रचार झाला. त्याचे निरसन व्हावे यासाठी हा प्रयत्न आहे.'' 
कासीम मुल्ला ,जमाअते इस्लामी हिंद 

एकोपा वाढवणारा उपक्रम

मिरजेतील बक्करसाब मशिदीतील सद्‌भावना समारंभासाठी उपस्थित राहता आले. हा विश्वास- एकोपा वाढवणारा उपक्रम आहे. अष्टगंधाचा नाम ओढलेले आणि टोप्या घातलेले हिंदू-मुस्लिम बांधवांमधील सहभोजन आणि चर्चा-संवाद सध्याच्या निराशेच्या वातावरणातील आशादायी असाच. प्रा. वाहीद खान यांनी सर्वांच्या प्रश्‍नांना खुलेपणाने उत्तरे दिली. अशा उपक्रमांची गरजही अधोरेखित झाली.'' 
गणेश तोडकर, मिरज 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Investment in US Stock Market : अ‍ॅपल–अ‍ॅमेझॉनचे शेअर्स घ्यायचेत? भारतीयांनी अमेरिकन शेअर बाजारात अशी करावी गुंतवणूक

Crime: दुर्दैवी! हॉटेलमध्ये गेला, दरवाजा बंद केला अन्... लोकप्रिय विनोदी कलाकाराच्या मुलाने जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

'मिसेस देशपांडे' वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ चांदेकरसोबत बोल्ड सीन देणारी अभिनेत्री आहे तरी कोण? चाहत्यांनाही उत्सुकता

Aravalli Hills : 29 जिल्ह्यांची लाइफलाइन, 20 अभयारण्य अन् 5 कोटी लोक जगवणारी...जर अरवली पर्वतरांग नसती तर काय झालंं असतं?

Junnar Leopard : जुन्नर वनविभागात बिबट्यांना पकडण्यासाठी ४०० पिंजरे तैनात; तरीही जुन्नरमध्ये बिबट संकट कायम!

SCROLL FOR NEXT