Public Commissioner wants information of three former corporators of Belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

लोकयुक्तांना हवी बेळगावच्या 'या' तीन माजी नगरसेवकांची माहिती... पण कशासाठी...?

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - बेळगावच्या तीन माजी नगरसेवकांची माहिती राज्याच्या लोकायुक्तानी महापालिकेकडे मागीतली आहे. त्यात माजी आमदार संभाजी पाटील, पिंटू सिद्दीकी व भैरगौडा पाटील यांचा समावेश आहे. यापैकी संभाजी पाटील व पिंटू सिद्दीकी यांचा मृत्यू दाखला महापालिकेकडून लोकायुक्ताना पाठवावा लागणार आहे. तर भैरगौडा यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची माहिती लोकायुक्तांना द्यावी लागणार आहे. महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून याबाबतची माहिती जमा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कोरोना काळात पालिका अधिकाऱ्यांना हे नवे काम लागले आहे.

लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात असताना नगरसेवकाना त्यांच्या स्थावर व जंगम मिळकतीची माहिती नियमितपणे द्यावी लागते. ती माहिती कौन्सिल विभागाकडून एकत्र केली जाते व लोकायुक्तांना पाठविली जाते. 2011 सालापासून लोकायुक्तांनी ही माहिती देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्या आर्थिक वर्षातील स्थावर व जंगम मिळकतींची माहिती विहीत नमुन्यात लोकायुक्तांकडे पाठवावी लागते. 9 मार्च 2019 रोजी बेळगाव महापालिकेच्या लोकनियुक्त सभागृहाचा कार्यकाळ संपला. पण बेळगावच्या नगरसेवकांना 2018-19 या आर्थिक वर्षाची माहिती कौन्सिल विभागाकडे जमा करावी लागली. कौन्सिल विभागाकडून ती माहिती लोकायुक्तांना पाठविण्यात आली. बेळगाव महापालिकेत 58 नगरसेवक होते, त्यापैकी 55 नगरसेवकांचीच माहिती लोकायुक्तांकडे पोहोचली. संभाजी पाटील, भैरगौडा पाटील व पिंटू सिद्दीकी यांची माहिती लोकायुक्तांना मिळाली नाही. त्यामुळे लोकायुक्तांनी या तिघांबाबत पालिकेकडे विचारणा केली. त्यावर संभाजी पाटील व पिंटू सिद्दीकी यांचे निधन झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. तर भैरगौडा यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याचे सांगण्यात आले. पण त्याचे पुरावे आता लोकायुक्तांना हवे आहेत.

संभाजी पाटील व सिद्दीकी यांचे निधन झाले आहे तर मग त्यांचा मृत्यू दाखला पाठवा असे सांगण्यात आले आहे. तर भैरगौड यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याचा आदेश असेल तर त्याची प्रत पाठविण्यास सांगण्यात आले. त्यामुळे कौन्सिल विभागाकडून मृत्यू दाखले व नगरसेवकपद रद्द आदेशाची प्रत मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. पिंटू सिद्दीकी यांचा मृत्यू 2018 साली झाला होता तर संभाजी पाटील यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले आहे. भैरगौडा यांचे नगरसेवकपद 2018 सालीच रद्द झाले होते. ती सर्व माहिती आता कौन्सिल विभागाकडून लोकायुक्तांना पाठवावी लागेल. लोकनियुक्त सभागृह असताना नगरसेवकांकडून स्थावर व जंगम मिळकतींची माहिती कौन्सिल विभागाकडे निर्धारीत वेळेत जमा केली जात नव्हती. त्यासाठी कौन्सिल विभागाकडून वारंवार पाठपुरावा केला केला जात होता. आता सभागृह नसतानाही कौन्सिल विभागाला तीन माजी नगरसेवकांची माहिती पाठवावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

Mumbai Local Megablock: गणेशोत्सवात मेगाब्लॉकचे विघ्न नाही, प्रवाशांना दिलासा; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

iPhoneचा भंडारा! Apple फोनचे मोफत वाटप, २२ सप्टेंबरला आयोजन; कुठे आणि कोण देणार? पाहा VIDEO

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

Chhatrapati Sambhajinagar Accident News: दुचाकीला कट लागल्याने रस्त्यावर कोसळला तरुण; मागून आलेल्या सिमेंट मिक्सरखाली आल्याने जागीच प्राण गमावले

SCROLL FOR NEXT