Public Library School Adoption Scheme
Public Library School Adoption Scheme 
पश्चिम महाराष्ट्र

सार्वजनिक ग्रंथालयांच्या शाळा दत्तक योजनेला मरगळ 

भगवान शेवडे

मांगले : वाचन संस्कृती पासून दूर चाललेल्या उदयोन्मुख पिढीला वाचत करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांनी सुरु केलेल्या शाळा दत्तक योजनेला मरगळ आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालये तर बंद आहेतच. 

मात्र शाळा महाविध्यालये पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतरही सार्वजनिक वाचनालयांना पुरेसे अनुदान न मिळाल्यामुळे संचालक मंडळ आणि कर्मचारीही ही योजना पुढे सुरु करण्यासाठी निरुत्साही आहेत . शाळा दत्तक योजना सुरु करण्यासाठी शासनाने ग्रंथालयांना सक्ती केली न्हवती, मोबाईलच्या जाळ्यात अडकलेल्या पिढीला वाचत करून ग्रंथालयांचे भविष्यातील वाचक तयार करण्याची हीच संधी संधी समजून काही वाचनालयांनी स्वयंस्फूर्तीने ही योजना राबवली होती.

सार्वजनिक ग्रंथालये गावातील माहिती केंद्रे व्हावीत यासाठी ग्रंथालयांनी लोकाभिमुक उपक्रम सुरु करावेत.यावेळी शासन इतर उपक्रमावर अमाप खर्च करत आहे. मात्र ग्रंथालयांच्या बाबतीत शासनाची अनास्था आहे, ग्रंथालये शाळांच्या मदतीला जात असताना विद्यार्थ्यांच्या शिवाय पालक आणि शिक्षक वाचायला शिकले पाहिजेत. अशी ग्रंथालय प्रेमी आणि शासकीय अधिका-यांची धारणा होती, मात्र आज तशी परिस्थिती नसल्याची खंतही अधिकारीच व्यक्त करीत आहेत. 

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालायांनी दत्तक घेण्यायोग्य प्राथमिक,माध्यमिक शाळेची निवड करून संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि इतर शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना विनामुल्य सभासद करून घेवून संबधित शाळेतील शिक्षकांनाही सभासद करून घेतले होते.या उपक्रमामुळे ग्रंथालयांना भेडसावणारी वाचकांची कमतरता नाहीशी होणार अशी अशा होती .मात्र शासनाची ग्रंथालयांच्याकडे बघण्याची मानसिकता सकारात्मक नाही त्यामुळे यापुढे ग्रंथालय चळवळीलाच मरगळ येते की काय अशी भीती व्यक्त होत आहे.

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT