पश्चिम महाराष्ट्र

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तीन फूट पाणी; वाहतूक बंदच

- राजेंद्र हजारे

निपाणी : कोकण फाट्यासह परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शुक्रवारपासून अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे. तर वेदगंगा नदीला (Vedhganga River) पूर येऊन यमगरणी (yamagarni) येथील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) पुलावर पाणी आल्याने रविवारी (ता. २५) सलग तिसरा दिवस महामार्गावरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे सर्व वाहने रस्त्याच्या कडेला थांबूनच आहेत. त्यामुळे चालक, क्लिनरांचे मोठे हाल होत आहेत. पाणी पातळी कमी झाल्यास सायंकाळपर्यंत महामार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. (Pune-Bangalore-National-Highway-Three-feet-water-Traffic-closed-yamagarni-nipani-live-update-akb84)

2019 साली असाच पाऊस झाल्याने तब्बल सात दिवस पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंद होता. या काळातही एनडीआरएफ पथक, पोलिस यंत्रणा कार्यरत असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. गुरुवारी मध्यरात्रीपासून यमगरणी जवळील पुलापासून मांगूर फाट्यापर्यंत तब्बल सात फुट पाणी साचले होते. दोन दिवसापासून पाऊस कमी झाल्याने आता रस्त्यावरील पाणी उतरत असून अद्याप तीन फूट पाणी शिल्लक आहे. त्यामुळे अजूनही पोलिस प्रशासनाने वाहनांना रस्त्यावरून जाण्यास परवानगी दिलेली नाही.

रविवारी दिवसभर पाऊस थांबल्यास सोमवारपासून वाहनांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.सलग तीन दिवस रस्ता बंद असल्याने दूध, फळे व जीवनावश्यक वस्तू करणाऱ्या वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. निपाणी शहर आणि परिसरातील काही सामाजिक मंडळांनी रस्त्यावर थांबलेल्या वाहनचालकांना नाष्टा, जेवणाची सोय केल्याने थोडाफार दिलासा मिळत आहे. एकंदरीत महामार्ग कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT