Corruption 
पश्चिम महाराष्ट्र

धक्‍कादायक...लाचखोरीत पुणे विभाग सलग पाच वर्षे अव्वल 

तात्या लांडगे

सोलापूर : भ्रष्टाचारमुक्‍त भारत करण्याची घोषणा अद्यापही पूर्ण झाली नसून सर्वसामान्यांच्या कामांसाठी अथवा बेकायदेशीर कामांसाठी टेबलाखालून पैसे घेण्याची पद्धत महाराष्ट्रात विशेषत: पुण्यात मागील पाच वर्षांपासून सुरूच आहे. लाचखोरीत पाच वर्षांत पुणे विभाग अव्वल असून दुसऱ्या स्थानावर नाशिक, औरंगाबाद तर तिसऱ्या स्थानावर ठाणे, नागपूर विभाग आहेत. सर्वाधिक कारवाई पोलिस व महसूल विभागातच झाल्याची नोंद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे झाली आहे. 

सरत्या वर्षात एक लाख 19 हजार 500 रुपयांसाठी राज्यातील तब्बल एक हजार 226 शासकीय अधिकारी व कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकले. त्यात सर्वाधिक पोलिस, महसूल, जिल्हा परिषद व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जानेवारी ते डिसेंबर 2019 या काळात राज्यात लाचखोरीच्या 881 गुन्ह्यांची नोंद झाली असून अद्यापही त्यातील 551 प्रकरणांचा तपास प्रलंबितच आहे. तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटलेल्या 141 प्रकरणांवर वरिष्ठ स्तरावरून निर्णय झालेला नाही. लाचखोरीतील आरोपींची चार कोटी 18 लाख रुपयांची बॅंक खाती गोठविण्याचा प्रस्ताव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सादर करूनही त्याला परवानगी मिळालेली नाही. 2019 मध्ये पुणे विभागात सर्वाधिक 181 लाचखोरीची कारवाई करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद व नाशिक विभागात प्रत्येकी 123, अमरावती व नागपूर विभागात 227 तर ठाण्यात 97 प्रकरणांत कारवाई करण्यात आली आहे. 


विभागनिहाय पाच वर्षांतील लाच प्रकरणे 
विभाग         लाचखोरीची प्रकरणे 
पुणे             982 
नाशिक        729 
औरंगाबाद    693 
नागपूर        646 
ठाणे           614 

लोकांचा विश्‍वास वाढत असल्याने तक्रारीत वाढ 
राज्याच्या बहुतेक विभागांची मुख्य कार्यालये पुण्यात आहेत. मोठमोठ्या महापालिका याच विभागात असल्याने लाचखोरीचे प्रमाण पुणे विभागात सर्वाधिक राहिले आहे. जानेवारी ते डिसेंबर 2019 या काळात पुणे विभागात सर्वाधिक लाचखोरीच्या 181 प्रकरणांत कारवाई करण्यात आली आहे. वाढत्या कारवायांमुळे नागरिकांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागावरील विश्‍वास वाढत असून तक्रारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. 
- संजीव पाटील, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : हनुमान जयंतीनिमित्त नाशिकच्या अंजनेरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT