पश्चिम महाराष्ट्र

पुसेगावच्या बैलबाजारात कोटींची उड्डाणे! 

सकाळवृत्तसेवा

पुसेगाव - शेतीसाठी शेतकऱ्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असला तरी शेतीच्या अनेक कामांसाठी शेतकऱ्यांना बैलांवर अवलंबून राहावे लागत असल्याने देखण्या व औताच्या बैलजोडींना येथील बैलबाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळेच रथादिवशी व दुसऱ्या दिवशी बैलबाजारात सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, यात्राकाळात जनावरांच्या बाजारात मोठी तेजी राहण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेदरम्यान येथे भरणारा बैलबाजार खिलार जनावरांसाठी पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. बैलगाडी शर्यतींवरील बंदीमुळे खिलार जनावरांच्या संगोपनात घट झाली असली तरी सध्या या बाजारात चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मनमाड, औरंगाबाद, जालना, सातारा, सांगली, पुणे येथून खिलार जनावरांच्या शौकिन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे. बैलबाजारात खोंडाना कमीत कमी 30 हजार रुपये किंमत आहे. सध्या राज्यात असलेल्या दुष्काळी स्थितीमुळे व चाराटंचाईमुळे पशुधन संभाळणे शेतकऱ्यांना जिकिरीचे झालेले आहे. त्यामुळे जत, सांगली, सांगोला, कवठेमहांकाळ या भागातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणली आहेत. पण, त्यांना योग्य भाव मिळत नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. शेतीकामाबरोबरच आषाढीवारीला जाणाऱ्या ज्ञानोबा माउली व तुकोबाराय यांच्या पालख्यांना आपली बैलजोडी देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने इच्छुक असतात. या पालख्यांना देखणी व मोठी बैलजोडी मिळावी, या अपेक्षेने पुणे जिल्ह्यातून शेतकरी मोठ्या संख्येने आलेले आहेत. 

जनावरांच्या बाजारात शेतकऱ्यांसाठी सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे मोफत चारा, पाणी, वीज तसेच लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच गोरगरीब शेतकऱ्यांसाठी केवळ पाच रुपयांत जेवणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. यात्रेत चरितार्थासाठी आलेल्या गोरगरीब महिलांना ट्रस्टतर्फे बेसन, बाजरीचे पीठ, गोडेतेल मोफत देण्यात आले आहे. प्रति जेवण मिळणारे पाच रुपये या बाजारात स्वयंपाक बनवून देणाऱ्या या महिलांना देण्यात येत असल्याचे सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व विश्वस्त मोहनराव जाधव यांनी सांगितले. 

पालखीसाठी 4. 75 लाखांची बैलजोडी  
पारगाव (ता. दौंड) येथील माउली ताकवणे यांनी पालखीसाठी चार लाख 75 हजार रुपयांची देखणी बैलजोडी या बैलबाजारात खरेदी केली, तर धायरी (जि. पुणे) येथील प्रगतशील शेतकरी सागर तळेकर यांनीही खिलार जनावरांचे प्रसिध्द व्यापारी राजू गिरी यांच्याकडून तीन लाख 42 हजार रुपयांना देखणा व मजबूत बैल खरेदी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT