पश्चिम महाराष्ट्र

"पुस्तकांचं गाव' उपक्रम चार फेब्रुवारीपर्यंत बंद

सकाळ वृत्तसेवा

भिलार (जि. सातारा) : "पुस्तकांचं गाव' भिलार (ता. महाबळेश्‍वर) येथे ता. दोन ते चार फेब्रुवारीदरम्यान वार्षिक यात्रा असल्याने गावातील वाचन सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रकल्प कार्यालयाकडून देण्यात आली. 

यात्रा काळात भिलारमध्ये अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. देशभरातील भिलारवासीय यात्रेच्या निमित्ताने गावी येणार आहेत. त्यामुळे गावातील घरे (प्रकल्पातील पुस्तक दालने) वाचक, पर्यटक आणि शालेय व महाविद्यालयीन सहलींना वाचन सेवा आणि पर्यटनविषयक सेवा देऊ शकणार नाहीत. मात्र, ता. 5 फेब्रुवारीपासून सर्व संबंधित सेवा पूर्ववत सुरू होतील. या पार्श्वभूमीवर पर्यटक व वाचकांनी सहकार्य करावे, अशी विनंती ग्रामपंचायत व प्रकल्प कार्यालयाने केले आहे.
 
Video : मी पुन्हा येईनने नेटकऱ्यांत घातला धुमाकूळ

ठाकरेंच्या हेलिकॉप्टरसाठी जागेची पाहणी 

महाबळेश्‍वर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्यापासून (शुक्रवारी) तीन दिवसांच्या खाजगी दौऱ्यासाठी महाबळेश्‍वरला येत आहेत. परंतु नेहमीपेक्षा मोठया आकाराचे हेलिकॉप्टरमध्ये ते येणार असल्याने ते उतरण्यासाठीची आवश्‍यक जागा शोधताना, प्रशासनाची दमछाक झाली आहे. दरम्यान, त्यांच्या सुरक्षेसाठी अतिरीक्‍त पोलिस अधिक्षक धीरज पाटील यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत आढावा घेतला.
 
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्‍वर हे ठिकाण ठाकरे कुटूंबियांचे आवडते ठिकाण आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर विश्रांतीसाठी ठाकरे कुटुंब गेली अनेक वर्षे महाबळेश्वर येथे येतात. (स्व) बाळासाहेब ठाकरे यांच्यापासुन ठाकरे कुटूंबाची ही परंपरा आहे. या वेळी मात्र राज्यातील विचित्र राजकीय परिस्थितीमुळे उद्धव ठाकरे विधानसभेनंतर महाबळेश्‍वरला आले नव्हते. परंतु आता आपल्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी तीन दिवसांचा वेळ काढला असून, त्याला निमित्त आहे ते शिवसेनेच्या आमदार पुत्रीच्या विवाहाचे...
 
ता. 31 जानेवारीला ठाकरे कुटूंब महाबळेश्‍वर येणार असून, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या होणाऱ्या या पहिल्याच जिल्हा दौऱ्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ सुरू झाली आहे. ते नेहमी एका छोटया हेलिकॉप्टरने येथे येत असत. येथे छोटया हेलिकॉप्टरसाठी अनेक ठिकाणे आहेत. परंतु या वेळी ते सिक्‍स सिटर हेलिकॉप्टरचा वापर करणार असून, या हेलिकॉप्टरचे पंखे अधिक मोठे असल्याने अशा मोठ्या आकाराच्या हेलिकॉप्टरसाठी जागा शोधण्याची तारेवरची कसरत प्रशासनाला करावी लागत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून जागेचा शोध घेतला जात आहे. वन विभागाने गेल्या अनेक वर्षांपासून पोलो ग्राऊंडवर हेलिकॉप्टर उतरण्यास बंदी केल्याने मोठी अडचण झाली आहे. काल सायंकाळी वेण्णालेक येथील पठाराचीही पाहणी करण्यात आली. परंतु प्रशासनाचे समाधान झाले नाही. महाबळेश्‍वर- पाचगणी रस्त्यावरील वेलॉसिटी मधील जागेची पाहणी झाली. परंतु कोणती जागा निश्‍चित झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
 
आढावा बैठकीसाठी पोलिस उपअधिक्षक अजित टिके, प्रांताधिकारी संगिता चौगुले, तहसिलदार सुषमा चौधरी, पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी आदी मान्यवरांसह विविध खात्यांचे अधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT