1Corona_Danger_19.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

लक्ष्मीनगरमधील बाधिताच्या संपर्कातील 23 व्यक्ती क्वारंटाइन 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः शहरातील कारखाना परिसरातील लक्ष्मीनगर भागात एकास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने तातडीने त्यांच्या कुटुंबातील व संपर्कातील 23 व्यक्तींना क्वारंटाइन केले आहे. त्यात कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. रात्री उशीरा सारा परिसर कंटेन्मेट-बफर झोन करण्यात आला. 

महापालिका क्षेत्रात गेल्या आठ दिवसांत रेव्हेन्यू कॉलनीतील दोन, फौजदार गल्लीतील एक आणि मिरजेतील एक, असे चार रुग्ण आढळून आले आहेत. काल कारखाना परिसरातील लक्ष्मीनगर येथे रुग्ण आढळला. बावन्न वर्षीय या रुग्णाच्या बाधेचा इतिहास स्पष्ट नाही. त्यांना कोरोना कोणाच्या संपर्कातून झाला हे स्पष्ट नाही. त्यांची प्रवासाचा इतिहासही दिसून येत नाही. या भागात मोठी नागरीवस्ती आहे. परिसरात घबराहट पसरली आहे. सोशल मीडियामधून या रुग्णाचे मुंबई-पुणे कनेक्‍शन असल्याची चर्चा सुरू होती. 

जिल्ह्यात काल एकाच दिवशी एकूण पाच नवे रुग्ण आढळल्याने जिल्हा हाय अलर्टवर आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या संख्येने अर्धशतक गाठले आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून, 32 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर उर्वरित 17 रुग्णांवर उपचार सध्या सुरू आहेत. दुधेभावी (ता. कवठेमहांकाळ) आणि कर्नाळ (ता. मिरज) येथील कोरोनाग्रस्त रुग्णांचा चौदा दिवसानंतर पुन्हा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक म्हणजे दुधेभावी येथील रुग्णांच्या कुटुंबातील पत्नी, भाचीसह घोरपडीतील तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Update: बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद! कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

ऑक्टोबरमध्ये येणार १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार, पेट्रोलचा खर्च फक्त २५ रुपये लीटर; गडकरींचा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Aditya Thackeray : हे सरकार निर्दयी! आदित्य ठाकरे यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT