Quarantine done to doctors from Dubai 
पश्चिम महाराष्ट्र

दुबईहून आलेले डॉक्टर बसले पेशंट तपासत, आता त्यांनाच केलं होम क्वॉरंटाईन

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोना नगर जिल्ह्यात हळूहळू पाय पसरायला लागला आहे. आतापर्यंत दोनच पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. मात्र, त्यांच्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे. या परिस्थितीचा काहीजण काळाबाजार करून फायदा घेत आहेत. प्रशासन आपल्या परीने विशेष काळजी घेत आहे. जे कोरोनाबाधित आढळले ते सुशिक्षित आहेत. दुबईहून आलेल्या लोकांनाच ही बाधा झाल्याचे आतापर्यंत दिसते आहे. तेथून ५ मार्चला आलेले एक डॉक्टर महाशय बिनदिक्कतपणे आपली ओपीडी चालवित होते.

प्रशासनाच्या ही बाब काही लोकांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलं. त्या डॉक्टर महाशयांनी खासगी ओपीडीसही व्हिजीट केल्याचे समोर आलं आहे. स्वतः एक डॉक्टर असतानाही त्यांनी लोकांमध्ये मिसळून तपासणी केली.

जिल्हाधिकार्यांनी जे लोक परदेशातून आले आहेत. त्यांना १४ दिवस विलगीकरण कक्षात राहण्याचा आदेश दिला होता. परंतु त्यांनी तसे न करता पेशंट तपासत राहिले. त्या डॉक्टरांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. तो निगेटीव्ही आल्यास लोकांच्या दृष्टीने चांगलेच आहे. परंतु पॉझिटिव्ह सापडल्यास मात्र, मोठ्या संकटाला सामोरे जावं लागणार आहे. त्या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्यांच्या पोटात गोळा यायला लागला आहे.

संशियिताच्या नातेवाईची हुज्जत

कोण कोणाच्या संपर्कात आलं आणि कोण नाही हे समजायला मार्ग नाही. कालच होम क्वॉरंटाईनसाठी ताब्यात घेतलेल्या संशियाताच्या नातेवाईकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं तेथे जाऊन त्यांनी हुज्जत घातली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना अॅम्बुलन्स बोलावून होम क्वॉरंटाईन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवी मुंबईत गोळीबाराचा थरार! इसम बाईकवरून आला, समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या अन्...; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Ayodhya: अयोध्येत सापडला ३०० वर्ष जुना खजिना! हाताने लिहिलेली 'रामचरितमानस'ची दुर्मिळ प्रत समोर; सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Weather: यंदाचा उन्हाळा ठरणार ‘विरोधाभासी’! उन्हाच्या कडक चटक्यांसह सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, आरोग्याबरोबरच शेती क्षेत्रावरही संकट..

विराट कोहलीला धुरंधर चित्रपट पाहून काय वाटलं? स्पेशल पोस्ट करत म्हणाला, 'मी भारतात कधीच याआधी...'

खरातशी कनेक्शन; IAS सह DCP, ACP दर्जाच्या महिला अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता, आवडत्या पोस्टिंगसाठी...

SCROLL FOR NEXT