Quarantine with nine doctors in Pravara 
पश्चिम महाराष्ट्र

"प्रवरा'मधील डॉक्‍टरांसह नऊ जण "क्वारंटाईन' 

सकाळ वृत्तसेवा

राहाता ः लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना संशयित रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांसह एकूण नऊ जणांना "क्वारंटाईन' करण्यात आले आहे. रुग्णालयातील विलगीकरण कक्षात या सर्वांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 

याबाबत राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे म्हणाले, ""श्रीरामपूर तालुक्‍यातील गोवर्धन येथील तरुण उपचारासाठी या रुग्णालयात आला. तो गतिमंद असल्याने डॉक्‍टरांना त्याची विचारपूस करण्यात अडचण निर्माण झाली. त्याला फिटसदृश त्रास होत असल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, कोरोनासदृश लक्षणे दिसल्याने त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. 

त्याला कोरोनाची बाधा झाल्याचा संशय असल्याने, प्रवरा रुग्णालयात त्याची तपासणी करणारे डॉक्‍टर व त्यांच्या मदतीला असलेले आरोग्य कर्मचारी मिळून नऊ जणांना "क्वारंटाईन' करण्याचा निर्णय रुग्णालय व्यवस्थापनाने घेतला आहे. या सर्वांना या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 
दरम्यान, लोणी बुद्रुक येथील कोरोनाबाधित रुग्णाचे कुटुंबीय व संपर्कातील अन्य लोकांचे अहवाल "निगेटिव्ह' आले आहेत आणि हा रुग्णदेखील कोरोनाबाधित नाही, असे दिशाभूल करणारे मेसेज सोशल मीडियावर टाकण्यात आले.

हे मेसेज टाकणाऱ्या व फॉरवर्ड करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. या मेसेजचे स्क्रीन शॉट घेऊन कारवाई केली जात आहे, असे तहसीलदार हिरे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT