The question of Sangamner's garbage depot is likely to settle 
पश्चिम महाराष्ट्र

संगमनेरच्या कचराडेपोचा प्रश्न चिघळण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर: नगरपालिकेच्या संगमनेर खुर्द गावाच्या हद्दीत असलेल्या कचरा डेपोला लावलेले कुलूप स्थानिकांशी केलेल्या विचारविनिमयानंतर काढण्यात नगरपरिषदेला यश मिळाले असले, तरी हा कचराडेपो तालुक्‍यातील कुरण गावाच्या हद्दीत सुरू करण्यास गावकऱ्यांनी आज तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे येथील कचऱ्याचा प्रश्न चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.


संगमनेर खुर्द गावाच्या हद्दीत नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला सुमारे 60 वर्षांपासून संगमनेर नगरपालिकेचा कचरा डेपो आहे. या परिसरातील सात गावांमधील जल व वायूप्रदूषणामुळे त्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने, हा प्रश्न न्यायप्रवीष्ट झाला. याबाबत हरित लवादानेही हस्तक्षेप केला आहे. कचरा डेपोसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने 2011 मध्ये कुरण गावाच्या हद्दीतील सर्व्हे नंबर 257 मधील पाच हेक्‍टर जागा आरक्षित केली आहे. तशी कागदोपत्री नोंदही फेरफार क्रमांक 2701 नुसार झाली असून स्वतंत्र सात-बारा निघतो आहे. संगमनेर खुर्दचा कचराडेपो कुरणला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्याने, तेथील ग्रामस्थांनी कचराडेपो होऊ न देण्यासाठी कंबर कसली आहे.
याबाबत आज प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांना निवेदन देण्यात आले.

मुस्लिम व आदिवासी समाजाची वस्ती असलेल्या कुरण गावाला सापत्न वागणूक मिळत असून, कोणतेही सरकारी कार्यालय, दवाखाना नसलेल्या या गावी लोकप्रतिनिधी राहत नसल्याने, त्यांना ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी नाही. 257 या सर्व्हे नंबरशेजारी तीन पाझर तलाव, 500 मुले शिकत असलेला निवासी मदरसा व आदिवासी लोकवस्ती आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या प्रस्तावाला ग्रामसभेने ठराव करून 2010 पासून विरोध केला आहे.


संगमनेर खुर्दच्या जागेचे महत्त्व पाहता, लोकप्रतिनिधींनी बेनामी व्यवहार केल्याचा व त्यासाठी नातेवाइकांना हाताशी धरून कचराडेपोचा प्रश्न उपस्थित केल्याचा आरोपही कुरणच्या ग्रामस्थांनी केला आहे. हा कचराडेपो संगमनेर साखर कारखाना व दूध संघाच्या परिसरातील रिकाम्या जागेत हलविल्यास मळी व दुधाच्या वासात त्याची दुर्गंधी लपणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या निवेदनावर अमिर शेख, महंमद शेख, फैरोज शेख, इमरान शेख, हाफीज शेख, रियान शेख, अन्वर शेख, रमेश सोनवणे, माधव सोनवणे आदींसह 21 ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीप सिंगला संधी मिळणार? कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

SCROLL FOR NEXT