Kalamwadi dam sakal
पश्चिम महाराष्ट्र

राधानगरी ९० टक्के; काळम्मावाडीतून विसर्ग सुरू

काळम्मावाडी धरण आज सांडवा पातळीपर्यंत भरले. धरणात २० टीएमसी पाणीसाठा झाला.

सकाळ वृत्तसेवा

काळम्मावाडी धरण आज सांडवा पातळीपर्यंत भरले. धरणात २० टीएमसी पाणीसाठा झाला.

राधानगरी - काळम्मावाडी धरण आज सांडवा पातळीपर्यंत भरले. धरणात २० टीएमसी पाणीसाठा झाला. पाणीसाठा नियंत्रित राखण्यासाठी दुपारी दोन वाजता धरणाचे पाच वक्राकार दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले. या दरवाजातून 423 तर वीज निर्मितीसाठी सोडलेले 1000 असा 1423 क्युसेस पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीत सुरू आहे. राधानगरी धरण 90 टक्के भरले असून पावसाचा असाच जोर राहील्यास उद्या सायंकाळ पर्यंत पूर्ण भरण्याची शक्यता आहे.

हे धरण 646 मीटर पाणी पातळी झाली की पूर्ण भरते. आज सकाळी पाणी पातळी 641 मीटर झाल्यानंतर धरण सांडवापातळीपर्यंत भरले. धरणक्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी (119 मिलिमीटर ) झाली. आज अखेर धरण क्षेत्रात 1867 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात पाणलोट क्षेत्रातून 13000 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. संध्याकाळी धरणात 20.10 टीएमसी पाणीसाठा झाला असून 79 टक्के भरले आहे.

राधानगरी धरण आज सायंकाळी 90 टक्के भरले. धरणात साडेसात टीएमसी होऊन अधिक पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण भरण्यास आता केवळ अर्धा टीएमसी पाणीसाठा आणि तीन फूट पाणी पातळी होणे बाकी आहे. उद्या संध्याकाळपर्यंत धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. धरणक्षेत्रात 24 तासात 150 मिलिमीटर पाऊस झाला. तर सकाळी आठ पासून सायंकाळी चार पर्यंत 102 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाणलोट क्षेत्रातून धरणात प्रति सेकंद 8000 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्नपत्रिकेवर वधु-वरांची जन्मतारीख बंधनकारक, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

Pune Crime : पुण्यात खळबळ! मैत्रीचा झाला रक्तरंजित शेवट; सिमेंटच्या दगडाने मित्राला संपवलं

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर दरड कोसळली

Electric Vehicles Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दणक्याला 'इलेक्ट्रिक' उत्तर! ई-वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ; राज्यात नऊ लाख, तर जळगावात 23 हजार 'ईव्ही'

लग्न मान्य नव्हतं, केतनला लोहगडावरून ढकललं; सिया गोयल आणि चेतन चौधरी कोण? प्रियकराचं होतं रणजी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न

SCROLL FOR NEXT