raghunath patil criticized anna hazare on the topic of budget in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

'या वयात अण्णांना कशाला हवा असला उद्योग ?'

शेखर जोशी

सांगली : शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याची घोषणा करून अण्णा हजारे यांनी माघार घेणे, हे चांगले लक्षण नाही. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांना भेटले आणि अण्णांचा सौदा झाला, अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.

ते म्हणाले, 'एकदा हिंदकेसरी झालेल्या पैलवानाने असल्या बारक्‍या कुस्त्या करायच्या नसतात. अण्णा हजारे एकेकाळी हिरो होते. त्यांच्या आंदोलनाने सरकार बदलले. आता तो काळ नाही, तुम्हाला निभावत नाही, तुमचे वय झाले आहे. तुम्ही शांत बसावे. जे होत नाही, ते करायचे नाही. या प्रकाराने तुमची होती नव्हती ती सारी घालवून घेतली आहे. कारण, एखादे आंदोलन पुकारले तर ते केले पाहिजे.'

पुढ बोलताना ते म्हणाले, 'अण्णांना विरोधी पक्षनेते भेटायला गेले, भेटले म्हणजे बाजार झाला, तुमचा बकरा केला. या वयात कशाला हवा असला उद्योग? तुमच्या गावाला कोणत्या मुख्यमंत्र्यांनी किती निधी दिलाय, हे रेकॉर्डवर आहेत. त्याशिवाय तुमच्या गावचा विकास झालाय का? उगाच काहीतरी सांगण्यात अर्थ नाही. अण्णांनी आता सारे सोडावे आणि निवृत्ती घ्यावी.

दिल्लीतील आंदोलनाबाबत रघुनाथदादा म्हणाले, 'त्या आंदोलनाच्या निमित्ताने शेतकरी प्रश्‍न ऐरणीवर आणलेला आहे. त्या आंदोलनात शेतकरी आत्महत्येचा विषय मात्र काढला जात नाही, हे आश्‍चर्यजनक आहे. देशात शेतकरी मरतोय. महाराष्ट्र, आंध्र, पंजाबमध्ये आत्महत्यांची संख्या अधिक आहे. पंजाबची इंच अन्‌ इंच जमीन पाण्याखाली असताना तेथे शेतकरी मरतोय, त्यावर बोलायला नको का? हे कायदे वाईट असतील तर आधीचे चांगले आहेत का? त्याचे उत्तर द्यावे लागेल. आधीच्या विषयावर आंदोलक बोलत नाहीत, कारण विरोधी पक्ष नाराज होतील, असे त्यांना वाटतेय. आम आदमी, अकाली दल, कॉंग्रेस सारे त्यांच्या मागे आहेत.'

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT