तीन जणांच्या टोळीला अटक sakal
पश्चिम महाराष्ट्र

रायबाग : आठ लाखाचा मुद्देमाल जप्त - तीन चोरट्यांची टोळी गजाआड

तिघाही आरोपींनी चोरीची कबुली दिली आहे

एम. ए. रोहिले

रायबाग: बांधकाम साहित्य चोरी करणाऱ्या तेरदाळ येथील तीन जणांच्या टोळीला हारुगेरी पोलिसांनी मुगळखोड क्रॉसवर गजाआड केले. या कारवाईत त्यांच्याकडून चोरलेले साहित्य व त्यासाठी वापरलेले वाहन असा आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. अल्लमप्रभू केळगिनमनी, दर्शन जारगौडर व रमेश भोसले (सर्व रा. व ता. तेरदाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मुगळखोड क्रॉसवर संशयितरित्या हालचाली दिसून आल्याने हारुगेरी पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अल्लमप्रभू केळगिनमनी, दर्शन जारगौडर यांना २१ फेब्रुवारीला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता तालुक्यातील विविध गावातील अनेक ठिकाणी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच चोरलेले बांधकाम साहित्य रमेश भोसले याला विकल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून 6 लाख 55 हजार 700 रुपयांच्या 572 लोखंडी प्लेट व स्लॅबचे 47 जॅक आणि चोरीसाठी वापरले दीड लाख रुपये किंमतीचे टाटा-एस मालवाहू वाहन जप्त करण्यात आले. तिघाही आरोपींनी चोरीची कबुली दिली आहे.

जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, रायबागचे मंडल पोलिस निरीक्षक के. एस. हट्टी, हारुगेरी पोलिस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक आर. आर. कंगनोळी, पोलिस उपनिरीक्षक राघवेंद्र खोत यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत अंबी, आर. पी‌. कट्टेकरी, कुमार पवार, बी. एल. होसट्टी, अनिल मडिवाळ, अशोक शांडगे, प्रकाश सप्तसागर यांच्यासह पोलिसांनी ही कारवाई केली.

हारुगेरी पोलिस याबाबत अधिक चौकशी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT