पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरः पिरवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - पिरवाडी (ता. करवीर) येथील तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून १२ वाहनांसह पोलिसांनी १२ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. करवीर उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव यांच्याकडील विशेष पथकाने काल (ता. ८) रात्री कारवाई केली. त्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरेसह १९ जणांना ताब्यात घेत करवीर पोलिसांच्या स्वाधीन केले. या कारवाईचे नागरिकांतून स्वागत होत आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सचिन चंद्रकांत सावंत (वय २६), सूरज हणमंत साखरे (३२, दोघे रा. देवकर पाणंद), इस्माईल शौकत बागवान (३५ रा. सुभाषनगर), दादा महिपती आळवेकर (२२, रा. कसबा बावडा), रोहित शंकर जगमलाणी (३०, रा. सरलष्कर भवन), शेखर दिलीप गाडेकर (२८, जयसिंगपूर), विनायक रामभाऊ केळवेकर (३३, संभाजीनगर), उमेश दिनकर उलपे (२२, कसबा बावडा), जयदीप राजाराम अतिग्रे (२८, पडवळवाडी), संभाजी हणमंत जाधव (४०, साळोखेनगर), स्वप्नील तुकाराम पोवार (२४, कळे), सागर सुभाष पाटील (३२), अभिजित सुभाष पाटील (३०, मंगळवार पेठ), सरदार आनंदा पाटील (२६, आर. के.नगर), श्रीकांत शामराव पाटील (२९, रा. कुर्डू), अमित बाळासाहेब बुकशेठ (३५, रुईकर कॉलनी), प्रकाश बाबूराव पाटील (४०, राजोपाध्येनगर), वासिम महमूद कुमंदन (२९, न्यू शाहूपुरी), श्रीधर दत्तात्रय डावरे (३६, सोनगे) यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात राजरोजपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर प्रकाशझोत टाकणारी ‘मटक्‍याचा विळखा’ ही मालिका दैनिक ‘सकाळ’मधून प्रसिद्ध झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. 
शनिवारी रात्री पिरवाडी येथील एका बंद घरामध्ये तीनपानी जुगार सुरू असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. पथकाने पिरवाडी येथे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. रात्री उशिरा छापा टाकला. तेथून १२ वाहने, २२ मोबाईल, ८६ हजारांची रोकड यासह टीव्ही, गॅस शेगडी असा सुमारे १२ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, यातील काहींवरील कारवाई टाळण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पोलिसांशी संपर्क सुरू होता. त्याचबरोबर संशयितांची छायाचित्रे माध्यमापर्यंत पोचू नयेत, यासाठीही प्रयत्न सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT