Raigad Lok Sabha 2024 Esakal
पश्चिम महाराष्ट्र

Raigad Lok Sabha 2024: रायगड शिवसेनेला मिळणार? महायुतीत मित्रपक्षाच्या नाराजीमुळे सुनील तटकरेंची सावध भूमिका

Raigad Lok Sabha 2024: रायगड मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. अनंत गीते येथून सलग सहा वेळा विजयी झाले होते. हा गड कोणीही काबीज करू शकणार नाही, असा अनंत गीतेंचा भ्रमाचा भोपळा सुनील तटकरेंनी फोडला.

सकाळ वृत्तसेवा

Raigad Lok Sabha 2024: रायगड मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. अनंत गीते येथून सलग सहा वेळा विजयी झाले होते. हा गड कोणीही काबीज करू शकणार नाही, असा अनंत गीतेंचा भ्रमाचा भोपळा सुनील तटकरेंनी फोडला. मध्यंतरीच्या कालावधीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली. दोन्ही पक्ष कमकुवत झाल्याने सुनील तटकरे यांच्या पाठीशी शिवसेना (शिंदे गट), भाजप यांची ताकद आहे; मात्र, यात एकजूट नाही. तर, अनंत गीते ‘मविआ’ च्या माध्यमातून मतदारांची सहानुभूती मिळवीत आहेत, यातून रायगड काबीज करण्याचा प्रयत्न आहे.

२०१९ चे चित्र

सुनील तटकरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) विजयी मते : ४,८६,९६८

अनंत गिते (शिवसेना) मते : ४,५५,५३०

सुमन कोळी (वंचित बहुजन आघाडी) मते : २३,१९६

नोटा मते : १६,९६०

वर्चस्व

२००४ : काँग्रेस

२००९ : शिवसेना

२०१४ : शिवसेना

२०१९ : राष्ट्रवादी

सद्य:स्थिती

‘महायुती विरुद्ध मविआ’ लढतीचे चित्र

मित्रपक्षाच्या नाराजीमुळे सुनील तटकरेंची सावध भूमिका; उमेदवारी जाहीर होण्यास होतोय विलंब.

महायुतीकडून आदिती तटकरेंच्या उमेदवारीची होतेय चाचपणी

हे मुद्दे प्रभावी ठरणार

मुस्लिम मतदारांना जवळ करण्यासाठी राममंदिराचा मुद्दा बाजूला

वाद विसरुन अनंत गीते व जयंत पाटील एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट प्रबळ

मागील १४ वर्षापासून सुरु असलेले मुंबई-गोवा महामार्गाचे अपुरे काम

जिल्ह्यातून परत गेलेले मोठे औद्योगिक प्रकल्प, त्यामुळे वाढती बेरोजगारी

रायगड जिल्ह्यात जलजीवनची निकृष्ट कामे, त्यामुळे पाणीटंचाई दूर करण्यात आलेले अपयश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

SCROLL FOR NEXT