Railway Recruitment Board Examination Special train Students appearing Belgaum Thiruvananthapuram Railway sakal
पश्चिम महाराष्ट्र

रेल्वे बोर्डाच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बेळगाव तिरुवनंतपुरम रेल्वे

९ आणि १० मे रोजी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा

विनायक जाधव

बेळगाव : तिरुवनंतपुरम येथे होणाऱ्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय म्हणून नैऋत्य रेल्वेने परीक्षा स्पेशल बेळगाव तिरुवनंतपुरम रेल्वे उपलब्ध करून दिली आहे. परीक्षेच्या निमित्ताने उत्तर आणि दक्षिण कर्नाटकातील होणारी रेल्वेस्थानकावरील गर्दी लक्षात घेऊन ही विशेष रेल्वे सुरू केली आहे.

९ आणि १० मे रोजी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा आहे. त्यानिमित्त सात मे रोजी बेळगाव येथून विशेष रेल्वे सुटणार आहे. रेल्वे क्रमांक ०७३७१ बेळगाव-तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे शनिवारी (ता. ७) सकाळी सात वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावरून सुटणार असून रविवारी (ता. ८) दुपारी दोन वाजता तिरुवनंतपुरम येथे पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक ०७३७२ ‌तिरुवनंतपुरम सेंट्रल-बेळगाव रेल्वे सोमवारी (ता. ९) रात्री १० वाजता तिरुवनंतपुरम रेल्वे स्थानकावरून सुटणार असून बुधवारी (ता. ११) पहाटे तीन वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावर पोचणार आहे.

या विशेष रेल्वेला एकूण १५ कोच जोडण्यात आले असून पैकी २ कोच वातानुकूलित, ८ कोच स्लीपर कोच तर ३ सामान्य कोच असणार आहेत. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या भरतीसाठी जाणारे तसेच इतर प्रवासी या रेल्वे सेवेचा लाभ घेऊ शकतात, असे रेल्वे खात्याने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT