Road
Road 
पश्चिम महाराष्ट्र

पाणी अन्‌ चिखलातून रस्‍त्‍याचा शोध

सकाळवृत्तसेवा

पुसेगाव - कुमठे फाटा ते पुसेगाव दरम्यान रस्त्याच्या चौपदरीकरण कामामुळे उखडण्यात आलेला रस्ता पावसामुळे वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. नेर फाटा येथे कच्च्या रस्त्यावर पावसाच्या साचलेल्या दोन-तीन फूट खोल पाणी व चिखलातून वाहनचालकांना वाट शोधावी लागत आहे. 

पुसेगाव, कोरेगाव व या दोन्ही गावांच्या परिसरातील गावांत कामानिमित्त ये-जा करण्यासाठी या रस्त्याशिवाय अन्य पर्यायी रस्ताच नसल्याने या खोदलेल्या रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत आहे. वर्धनगड घाट उतरून पुसेगावकडे जाताना पहिल्याच उतारावरील रस्त्यावर साचलेल्या चिखलातून चारचाकी वाहनांची चाकेही घसरत असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. या रस्त्यावरून दररोज अनेक दुचाकी वाहने घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. या रस्त्यावरील चिखलाचा त्रास वारकऱ्यांनाही सहन करावा लागला.

दिंडीतील वृद्ध, महिला वारकऱ्यांना रस्त्यावरून चालणेही मुश्‍कील होत आहे. चिखलातून जाणाऱ्या वाहनांच्या चाकांना लागलेला चिखल वर्धनगड घाटातील डांबरी रस्त्यावर पसरून वाहतूकही असुरक्षित झाल्याने घाटातही अनेक वाहनांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

जिल्हाधिकारी लक्ष देणार का?
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ठेकेदारांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार न करता ऐन पावसाळ्यात मनमानीपणे काम करून या रस्त्याची वाट लावली आहे. प्रवासी व चालकांच्या सुरक्षिततेचा विचार करून या रस्त्यावर मुरूम व खडी टाकून हा रस्ता वाहतुकीस सुरक्षित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT