Raindrops; On extension of sugarcane cultivation
Raindrops; On extension of sugarcane cultivation 
पश्चिम महाराष्ट्र

पावसाची दडी; आडसाली ऊस लागवडी लांबवणीवर

विष्णू मोहिते

सांगली : जिल्ह्यात सध्या 14 हजार 953 हेक्‍टरवर आडसाली उसाची लागण झालेली आहे. गेल्या पंधरवड्यापासून पावसाने दडी मारल्याने ऊस लागवडी लांबवणीवर पडलेल्या आहेत. उपलब्ध पाण्यावर लागवणीकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. प्रत्येक वर्षीच मेपासून जुलैपर्यंत आडसाली उसाची लागण केली जाते. यंदाही ती काही प्रमाणात सुरु झाली आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे सध्या लागवडी थांबवण्यात आल्या आहेत. 

वाळवा, पलूस, मिरज, कडेगाव तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली जाते. यंदा मे महिन्यापासून आडसाली उसाची लागवडीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदा आडसालीच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज साखर कारखान्यांच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यात सर्वाधिक ऊस लागवड केली झाली आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे ऊस लागवड कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. आडसाली ऊस लागवड वेळेत झाली तर उसाचा उतारा चांगला मिळतो. शेतकरी पावसाची वाट न पाहता उपलब्ध पाण्यावर ऊस लागवड करण्याचे नियोजन करीत आहेत. 

सन 2021-22 च्या गाळपास जाणारा ऊस केवळ 711 हेक्‍टर आहे. तर कवठेमहांकाळ तालुक्‍यात 4146 हेक्‍टर आहे. मात्र, जत कवठेमहांकाळ तालुक्‍यात उसाची लागवड झाली नसल्याची नोंद कृषी विभागाच्या अहवालात आहे. एका बाजूला जिल्ह्यात ऊस लागवडीची धांदल सुरू असताना दुष्काळी पट्ट्यातील जत आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यात ऊस लागवडीसाठी शेतकरी पुढे आले नसल्याचे चित्र आहे. 
... 
तालुकानिहाय ऊस लागवड क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) मिरज- 1025, खानापूर- 74, वाळवा-10282, शिराळा- 70, तासगाव- 485, आटपाडी- 80, पलूस- 837, कडेगाव- 2082. एकूण 14 हजार 935. 
एकूण...14935 


सांगली
संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT