Rainfall in Sangli Miraj atmosphere weather update maharashtra
Rainfall in Sangli Miraj atmosphere weather update maharashtra  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Rain Update : सांगली, मिरजेत पावसाची हजेरी; वातावरणात गारवा

सकाळ वृत्तसेवा

अजित जळके

सांगलीः सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी आज सायंकाळी उन्हाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे पंधरा मिनिटे पाऊस पडला आणि त्यामुळे तापलेल्या वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला.

दुपारपासून उन्ह-सावलीचा खेळ सुरु होता. चारपासून ढग जमा होताना दिसत होता. उकाडा वाढला होता. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पावसाचे टपोरे थेंब सुरु झाले आणि पुढे पंधरा मिनिटे चांगला पाऊस झाला. मिरजेत तुरळक प्रमाणात सरी कोसळल्या.

विटा, खानापूर, भिवघाट परिसरात दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. वीस मिनिटे पडलेल्या हलक्या सरीने विट्यात डांबरी रस्त्यावरुन पाणी वाहत होते. सकाळपासून उन्हाचे असह्य चटके बसत होते. अचानक दुपारी हवेत बदल होऊन  पावसाला सुरुवात झाली. या  पावसाने मात्र तात्पुरता वातावरणात गारवा निर्माण झाला. अंकलखोप परिसरात विजासह जोरदार पावसाची हजेरी लावली. मिरज पश्‍चिम भागात तुंगसह ठिकठिकाणी पाऊस झाला.

सायंकाळा वातावरणात दाह कमी होऊ गारवा निर्माण झाल्याने लोक बाहेर पडले. सायंकाळनंतर बाजारात थोडी गर्दी दिसू लागली. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. मिरज मार्केटमध्ये रस्त्यावरून पाणी वाहत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT