Rainfall in Karjat taluka 
पश्चिम महाराष्ट्र

विजांच्या कडकडाटासह कर्जत तालुक्यात पाऊस

सकाळ वृत्तसेवा

कर्जत - तो दहाच मिनिटे आला, मात्र सगळीकडे पाणीच पाणी करून गेला. डोळ्यातही त्याने पाणी आणले. आज सायंकाळी कर्जतसह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोबत विजांचा कडकडाटात, वाऱ्याचा झटका आणि मोठे थेंब असा तिहेरी फटका समवेत घेऊन आला. कलिंगड आणि खरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र मोठे हाल सुरू झाले.

आधीच कोरोनामुळे बाजारपेठ बंद आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या या दोन्ही फळांना सध्या बाजारात लॉकडाऊन मुळे मार्केट नाही. आणि व्यापारी कवडीमोल किमतीने माल मागत आहेत. झालेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा मेळ बसवीत असतानाच घरचे झाले थोडे.......या उक्तीप्रमाणे आज सायंकाळी पावसाने धुमाकूळ घातला.

या पावसाने उन्हाची काहिली जरी थोडीफार कमी होत कोरोनामुळे जबरदस्तीने घरात सक्तीची विश्रांती घेणाऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांच्या पोटात शेतात फळं तोडणीला आलेले असताना तसेच अनेकांनी रात्री व्यापारी गाडी घेऊन न्यायला येणार असल्याने तोडून रास घालून ठेवली कलिंगड व खरबूज, याची अवकाळी  पावसाने उडवलेली दाणादाण उडाल्याने नुकसान झाले. चिंतेने फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या  पोटात  आग उठली आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? सूर्यकुमार यादवने स्पष्टच सांगितलं; उस्मान तारीकबद्दलही म्हणाला...

Maha Shivratri 2026: महाशिवरात्रीला फक्त 5 मिनिटांत काढा सुंदर रांगोळी! अंगणाची वाढेल दुप्पट शोभा

Devendra Fadnavis: ''असं जोडे चाटणं मी या जन्मात बघितलेलं नाही'', मुख्यमंत्री फडणवीस भडकले

Horoscope Prediction : फक्त आठ दिवसात बदलणार 4 राशींचं नशीब ! शुक्राच्या कृपेने होणार भरभराट

Horscope : उद्या 15 फेब्रुवारी! 'या' 4 राशीच्या लोकांची लॉटरी; अचानक मिळणार पैसे, खूप दिवसांपासूनची अपूर्ण इच्छा होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT