पश्चिम महाराष्ट्र

पाकिस्तानचे पाणी अडविण्यासाठी अमित शहांना नदीत बसवणार आहात का ?

संभाजी थोरात

कोल्हापूर - पाकिस्तानचे पाणी अडवण्याचा मुद्दा सतत चर्चेत आहे,  मात्र पाकिस्तानचे पाणी अडविण्यासाठी अमित शहांना नदीत बसवणार आहात का अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केली. तसेच अजित डोवालची चौकशी केली की सर्व बाहेर येईल असेही ते म्हणाले. 

राज ठाकरे एका खासगी चॅनेलच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान दोन दिवसांच्या कोल्हापूर दाैऱ्यावर श्री ठाकरे आले आहेत. त्यांनी आज सकाळी श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले त्यानंतर ते आमदार सतेज पाटील यांनाही भेटले.

श्री. ठाकरे म्हणाले, ज्यावेळी पुलवामात हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जिम कार्बेटमध्ये शूटिंग करत होते. ही घटना कळून देखील त्यांनी शुटींग थांबवले नाही. पुलवामा  हल्ल्यात शहीद झालेले जवान हे राजकीय बळी असल्याची गंभीर टीकाही श्री. ठाकरे यांनी यावेळीे केली.

निवडणुकीच्या तोंडावर एखादी मोठी घटना घडवून सगळ्याचे लक्ष दुसरीकडे वेधून घेण्याचा डाव असल्याचा आरोपही श्री ठाकरे यांनी केला. एखादी घटना लपवायची असेल तर दुसरी मोठी घटना आणायची हे सर्व सरकारमध्ये असते पण या सरकारच्या काळात जास्त घडते आहे. असेही ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय महिला संघाची 'ती' कृती अन् R Ashwin ने पुरुषांच्या संघाचे काढले वाभाडे; म्हणाला, ते फक्त प्रसिद्धीसाठी बाता मारतात, पण..

Pune News: पुणे जिल्ह्यात भीतीचा अंत! शिरूरमधील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश जारी

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Akkalkot News: 'अक्कलकोट तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना मिळणार स्वतंत्र इमारत'; एक कोटी पाच लाख निधी मंजूर; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा पुढाकार

Mumbai News : हाताला मेहंदी लावली म्हणून विद्यार्थीनीला वर्गातून बाहेर काढलं, पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार....

SCROLL FOR NEXT