The Rajaram Bapu factory won the 7-12 war
The Rajaram Bapu factory won the 7-12 war 
पश्चिम महाराष्ट्र

"7-12'ची लढाई राजारामबापू कारखान्याने जिंकली 

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिट नं.3 चे 7-12 चे उतारे व मालमत्तेवरील नोंदी वाळवा उपविभागाच्या प्रांताधिकाऱ्यांनी आज पूर्ववत बदलून दिल्या. न्यायालयीन लढाईमध्ये सत्याचा विजय झाला आहे. यामुळे आमचे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूक कंत्राटदार व हितचिंतकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.

श्री. पाटील म्हणाले,""विष्णू तुकाराम पाटील (रा. कर्नाळ) व त्यांच्या इतर दोन साथीदारांनी सर्वोदय सहकारी साखर कारखाना व राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना या दोन साखर कारखान्यांमधील करारासंदर्भात तत्कालीन सहकारमंत्र्यांकडे निवेदन दाखल केले होते.

या निवेदनासंदर्भांत त्यांनी तीन बैठका घेतल्या होत्या. हा संदर्भ घेऊन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिवांनी 25 जानेवारी 2019 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम तरतुदीचे पालन न करता राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखानाच्या कारंदवाडी युनिट नं.3 च्या नावावरील 7/12 उतारे व मालमत्तेवरील नोंदी रद्द करून सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या नावावरती करण्यात आल्या होत्या.

त्यानंतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडे 5 फेब्रुवारी 2019 रोजी या आदेशास स्थगिती दिली होती. त्यानंतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने वाळवा उपविभागाचे प्रांताधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते. परंतु सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या विनंतीवरून हे अपील सांगली जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) यांच्याकडे वर्ग करण्यात आले होते.

उपजिल्हाधिकाऱ्यांनी 24 जानेवारी 2020 रोजी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने केलेले अपील मान्य करून सर्वोदय सहकारी साखर साखर कारखान्याच्या नावावर केलेले 7/12 उतारे व मालमत्तेवरील नोंदी पूर्ववत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कारंदवाडी युनिट नं.3 च्या नावावरती करण्याचे आदेश पारित केले होते.

या आदेशानुसार प्रांताधिकाऱ्यांनी आज पूर्ववत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कारंदवाडी युनिट नं.3 च्या नावावरती 7/12 उतारे व मालमत्तेच्या नोंदी केल्या आहेत.'' यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, संचालक श्रेणीक कबाडे, विराज शिंदे, माणिक शेळके, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT