Chandrabhaga river
Chandrabhaga river 
पश्चिम महाराष्ट्र

स्वातंत्र्याची उर्मी पेरणाऱ्या चंद्रभागेच्या वाळवंटाकडे दुर्लक्ष

राजाराम ल. कानतोडे

पंढरपूर केवळ अध्यात्मीक राजधानी नाही तर मानवी स्वातंत्र्याची उर्मी पेरणारे ते एक शक्तीस्थळ आहे.

चंद्रभागेच्या वाळवंटाने मराठी माणसाच्या रक्तात स्वातंत्र्याचे बीज रोवले आणि त्याची फलश्रुती छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात झाली. केवळ तेवढेच नव्हे भारताच्या राज्यघटनेची मुळे याच वारशातून आली आहेत. हा वारसा जपण्यासाठी चंद्रभागा नमामि प्राधिकरण स्थापण्याची घोषणा राज्य सरकारने केली. पण या प्राधिकरणाची गेल्या सहा महिन्यात एकही बैठक झाली नाही. कधी करणार सरकार या कामाला सुरवात?

स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यांचा विचार केला जातो तेव्हा इतिहासात फ्रेंच राज्यक्रांतीचा दाखला शोधला जातो. पण त्याआधी आमच्या पंढरीच्या वाळवंटात वारकरी संतांनी ही जीवनमुल्ये रुजविली. पंढरपूर तीर्थक्षेत्र भीमा नदीच्या काठावर वसले आहे. ही नदी इथे अर्धचंद्राकृती वाहते म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. शापित चंद्र येथे येऊन स्नान केल्यानंतर शापमुक्त झाला म्हणून ही नदी इथे अर्धचंद्राकार वाहू लागली, अशी आख्यायिकाही सांगितली जाते. ज्ञानेश्‍वर आणि नामदेवाच्या कालखंडात या चंद्रभागेचे आणि वाळवंटाची महती वाढली. त्याचे कारण महाराष्ट्रातील संतांनी जातीपाती मानल्या नाहीत. संत नामदेव महाराजांनी पहिल्यांदा या वाळवंटात कीर्तन सुरू केली. माणूस महत्वाचा मानून त्याच्या उन्नतीसाठी पांडुरंगाच्या भक्तीने मुक्तीचा मार्ग सगळ्यांसाठी खुला केला. चंद्रभागेच्या वाळवंटांने सगळ्या जातीधर्माच्या लोकांना आपल्या कुशीत सामावून घेतले. ज्ञानेश्‍वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संतांच्या मार्गक्रमानाने पंढरीचे महात्म्य वाढत गेले. शिवाजी महाराजांत स्वराज्य स्थापनेची उर्मी निर्माण करणारे हे वाळवंट आहे, तसे या देशाच्या राज्यघटनेची बीजेही याच वाळवंटापर्यंत जातात. राज्यघटनेचा गाभा स्वातंत्र्य, समता, बंधुता हा आहे. या मुल्यांचा पुरस्कार घटनेचा मसुदा लिहिताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. डॉ. आंबेडकर यांचे गुरू महात्मा ज्योतिबा फुले होते. महात्मा फुले हे संत तुकारामांना आपले गुरू मानत. संत तुकाराम यांना "तुका झालासे कळस' असे वारकरी संप्रदाय मानतो. त्यामुळे स्वातंत्र्याची उर्मी मराठी माणसाच्या नसानसांत या वाळवंटाने पेरली आहे.

यशवंतरावांची प्रार्थना फळाला पण....
महाराष्ट्राचे भाग्यविधाते (कै.) यशवंतराव चव्हाण यांनी सात मार्च 1966 मध्ये उजनी धरणाचे भूमिपूजन केले. त्यावेळी त्यांनी प्रार्थना केली होती, "विठ्ठला तुझ्या चरणाजवळ चंद्रभागा अठ्ठावीस युगे वहात आली आहे. या चंद्रभागेला आम्ही उजनीजवळ थांबवीत आहोत. ग्यानबा, तुकाराम म्हणत महाराष्ट्रातला शेतकरी आषाढी कार्तिकीला तुझ्या दाराशी येत असतो. त्या शेतकऱ्याच्या शेतीत, झोपडीत विठ्ठला आता तू जा. तेथे तुझ्या चंद्रभागेला भेट. तू पंढरपूरच्या मंदिरात राहू नकोस.' धरण 1980 ला पूर्ण झाले. सोलापूरच नव्हे तर पुणे, नगर जिल्ह्याचा परिसर संपन्न झाला. शेती पिकली. उसाचे पीक डोलू लागले. साखरे कारखाने उभा राहिले. पण बारमाही वाहणारी चंद्रभागा मात्र कोरडी पडली.

गेल्या काही दिवसांत वारकऱ्यांची सोय व्हावी म्हणून काही बंधारे बांधले तरी पात्राची अवस्था वाईटच आहे. वाळवंटात कचऱ्याचे ढीग दिसतात. म्हशी, गाड्या धुतल्या जातात. पंढरपुरातील सांडपाणी अनेक ठिकाणी चंद्रभागेत सोडले जाते. यावर उच्च न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घातले. गेल्या वर्षी आषाढी वारीत स्वच्छतागृहांची सोय करा, म्हणून सरकारला खडसावले. जर स्वच्छतेची सोय करता येत नसेल तर वारी भरवू नका, असा इशारा न्यायालयाने दिला. चंद्रभागेच्या आणि वाळवंटाच्या स्वच्छतेबाबत पावले उचलण्यास भाग पाडले.

राज्य सरकारची घोषणा
आता चंद्रभागा सतत वहात राहावी म्हणून राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. येत्या 2022 पर्यंत चंद्रभागा प्रदुषणमुक्त करण्याचे धोरण आखण्याचे योजिले आहे. त्यासाठी 2016-17 च्या अर्थसंकल्पात 20 कोटींची तरतूद केली आहे. त्यानंतर पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रभागा नमामि प्राधिकरण स्थापण्याची घोषणा केली. भीमा नदीच्या उगमापासून चंद्रभागा नदीपर्यंत प्रदूषणमुक्तसाठी ठोस कार्यक्रम राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पण गेल्या सहा महिन्यात त्याबाबत काहीच झालेले नाही. प्राधिकरणाच्या सदस्यांची बैठक झाली नाही. मात्र चंद्रभागेतून वाळू उपसा होत असल्याच्या बातम्या सतत येत आहेत. सरकार या कामाला गती देणार की नाही हा प्रश्‍न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT