पश्चिम महाराष्ट्र

बापरे! हा माणूस 16 वर्षांपासून जेवलाच नाही..!(व्हिडिओ)

विश्वनाथ लिमये

सोलापूर : समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आढळतात. प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत असते. सोलापुरातील एका छायाचित्रकाराचीही जगण्याची एक अशीच हटके पद्धत आहे. हा माणूस मागील 16 वर्षांपासून जेवलेलाच नाही. दूध आणि दह्यावर तो आपली दैनंदिन भूक भागवत आहे.



राजेंद्र व्हनसुरे असे या व्यक्तीचे नाव असून ते व्यवसायाने छायाचित्रकार आहेत. राजेंद्र उत्तम फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेतच, मात्र आता ते त्यांच्या आहारामुळे चर्चेत आहेत. सुरुवातीला दोनवेळा आणि आता चारवेळा दूध हे त्यांचं अन्न झालं आहे. त्यामुळे गेल्या 16 वर्षांपासून ते जेवण म्हणून ओळख असणाऱ्या पदार्थ शिवलेही नाहीत. सोलापुरातील नेहरूनगर भागात हे 52 वर्षीय गृहस्थ राहतात. 

2 मार्च 2003 रोजी महाशिवरात्रीचा उपवास पकडल्यावर दुधावर राहण्याची कल्पना राजेंद्र यांना सुचली. शिवरात्रीच्या दिवशी राजेंद्र यांचा उपवास होता. त्यादिवशी त्यांनी फराळ आणि दूध घेतलं. दुसऱ्या दिवशीही दूध घेऊन बघूया असं वाटलं. त्यानंतर आठवडा, वर्ष करत करत आज 16 वर्षे झाली आहेत.




दरम्यान, मार्च महिन्यात कामानिमित्त बाहेर जात असताना राजेंद्र यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. अपघातात राजेंद्र यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. मात्र, या ऑपरेशनदरम्यान डाव्या पायाचा खुबा मोडला. इतर सर्व हाडे व्यवस्थित असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. राजेंद्र यांच्या या अनोख्या आहारामुळे सुरुवातीच्या काळात कुटुंबीय काळजीत होते. त्यांनी जेवण करावं यासाठी अनेक क्लुप्त्या करण्यात आल्या, मात्र, राजेंद्र यांनी आपल्या निश्चयावर ठाम राहणे पसंद केलं. त्यामुळे राजेंद्र यांच्या या अनोख्या पद्धतीची सवय झाली आहे.

16 वर्षात राजेंद्र यांना जेवण्याची इच्छा देखील झाली नाही. आपण धार्मिक उपास-तपास यामुळे हे करत नसून शरीर सदृढ राहण्यासाठी हे करत असल्याचं राजेंद्र नेहमी सांगतात. विशेष म्हणजे या 16 वर्षांच्या काळात एकदाही ते आजारी पडलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जेवण बंद केल्याने राजेंद्र यांना कोणताही त्रास नाही, ना ते 16 वर्षात कधी आजारी पडले आहेत. पूर्वी मात्र त्यांना एका वर्षात 10 ते 15 वेळा डॉक्टरांकडे जावे लागत होते. आता मात्र आहारातील या बदलामुळे त्यांचे आजार कमी झाल्याचं राजेंद्र व्हनसुरे यांचं म्हणणं आहे. माणसाचे आहार हे आहारातून होत असतात. त्यामुळे आहार शैलीत अनेक जण सध्या बदल करत आहेत. तसाच काहीसा बदल राजेंद्र यांनी केला आहे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT