Raju Shetti Vishal Patil 
पश्चिम महाराष्ट्र

राजू शेट्टींनीच विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार झाले पाहिजे - विशाल पाटील

सकाळवृत्तसेवा

सांगली ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टींनीच विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार झाले पाहिजे. त्यांनी कोणत्याही कारणाने नकार देऊ नये. सैल झालेली संघटना पुन्हा बांधण्यासाठी त्याची गरज आहे, असे मत कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी "सकाळ' शी बोलताना व्यक्त केले. 
श्री. पाटील यांनी सन 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवली होती.

त्याआधीही शेट्टींशी त्यांचे सलोख्याचे संबंध राहिलेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त ते अधिक निकट आले. या पार्श्‍वभूमीवर शेट्टींच्या राजकीय वाटचालीतील कोंडीच्या काळात पाटील यांनी शेट्टींच्या बाजूने भूमिका मांडली. 
ते म्हणाले,""शेट्टींनी विधान परिषदेची आमदारकी स्वीकारलीच पाहिजे. ती त्यांनी नकारावी, असे कारण नाही. खरे तर त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आधी त्यांचा कॉंग्रेसने विचार करायला हवा होता. ते घडत नसेल आणि राष्ट्रवादी हात पुढे करत असेल तर मागे हटायचे कारण काय? संघटनेने अनेकांना अनेक पदे दिली. जे टीका करीत आहेत, त्यांनाही जिल्ह्यातील महत्वाची पदे मिळालीत. ती कोणामुळे मिळाली, याचाही विचार चळवळ करेल. भविष्यात अजून संधी असतील त्या इतरांसाठी असतील. ही वेळ शेट्टींचा आवाज विधान परिषदेत जाण्याची गरज आहे.'' 


ते म्हणाले,""हे करीत असताना त्यांनी लोकसभा मात्र सोडून चालणार नाही. त्यांनी लोकसभा लढलीच पाहिजे. कारण, त्यांची गरज देशाच्या राजकारणात आहेत. ते दिल्लीत गेले पाहिजेत. त्यासाठी विधान परिषदेचा राजीनामा देता येऊ शकेल. सन 2024 ची लोकसभा डोळ्यासमोर ठेवून संघटना बांधणे आणि सैल पडत चाललेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी शेट्टींकडेच पद असणे गरजेचे आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोयना धरणातून सांडव्यावरील विसर्ग बंद; पायथा विद्युतगृहातून १,०५० क्युसेक पाणी सुरू

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT