कोल्हापूर- शहिद गोविंद पानसरे अमर रहे, अशा घोषणा देत शुक्रवारी सकाळी शाहूपुरीतील बी.टी. कॉलेजपासून निघालेल्या  मॉर्निंग वॉक मध्ये सहभागी कार्यकर्ते. (नितीन जाधव - सकाळ छायाचित्रसेवा)
कोल्हापूर- शहिद गोविंद पानसरे अमर रहे, अशा घोषणा देत शुक्रवारी सकाळी शाहूपुरीतील बी.टी. कॉलेजपासून निघालेल्या मॉर्निंग वॉक मध्ये सहभागी कार्यकर्ते. (नितीन जाधव - सकाळ छायाचित्रसेवा) 
पश्चिम महाराष्ट्र

अमर रहे... गोविंद पानसरे अमर रहे...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, ॲड. गोविंद पानसरे आणि प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ पकडावे, या मागणीसाठी आज बी. टी. कॉलेजपासून ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ झाला. शहीद गोविंद पानसरे, समता संघर्ष समितीतर्फे याचे आयोजन केले होते.

अमर रहे अमर रहे डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे, अमर रहे अमर रहे कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे, अशा घोषणांनी आज सकाळी सातपासून शाहूपुरीचा गल्लीबोळ दुमदुमून गेला. सकाळी बी. टी. कॉलेजपासून मॉर्निंग वॉकला सुरवात झाली. मोजकेच पण सच्चे, कट्टर कार्यकर्ते या वॉकमध्ये सहभागी झाले होते. प्रकाश हिरेमठ यांनी शहिदांवर गाणीही सादर करून वॉकमध्ये आणखी जिवंतपणा आणला. तर शाहीर राजू राऊत यांनी शहीद भगतसिंग यांच्यासह क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित गीते गायली. पानसरे यांचे छायाचित्रे असलेली बॅनर होती. बी. टी. पासून शाहूपुरी चौथी गल्ली, नाईक ॲण्ड नाईक कंपनी, शाहूपुरी सहावी, आठवी, नववी गल्ली, कुंभार गल्ली अशा मार्गांवरून फिरून शाहूपुरीतील भास्करराव जाधव यांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला. सुरेश शिपूरकर यांनी भाषण करून मॉर्निंग वॉक कायम सुरू राहणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करून समारोप केला.

येथे दिलीप पोवार, व्यंकाप्पा भोसले, सुमन पाटील, सुमन घोसे, संजय पाटील, कृष्णात कोरे, रमेश वडणगेकर, अजय अकोळकर, एकनाथ माजगावकर, अरविंद आरेकर, प्रकाश कातवरे, शर्मिला भोसले, तनुजा शिपूरकर, सीमा पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT