Ram-Shinde
Ram-Shinde 
पश्चिम महाराष्ट्र

राहाता मतदारसंघ भाजपकडे राहणे स्वाभाविकच; पालकमंत्री राम शिंदे

सकाळ वृत्तसेवा

नगर : "आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची महायुती लवकरच निश्‍चित होणार आहे. भाजपचे 123, तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत. त्यासाठी जागा वाटपासंदर्भात नव्याने फॉम्युला तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात राहाता मतदार संघाची जागा महायुतीला कधीही जिंकता आली नाही. आता तेथील उमेदवार गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये आलेले आहे. त्यामुळे राहाता मतदारसंघ भाजपकडे राहणे हे स्वाभाविकच आहे'' असा दावा पालकमंत्री राम शिंदे यांनी केला. 

शासकीय विश्रामगृहावर महाजनादेश यात्रेसंदर्भात बैठक पार पडली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, शहरजिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते.

त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले, " महाजनादेश यात्राचा पहिला टप्पा संपून, दुसरा टप्पा सुरू झाला आहे. रविवारी (ता. 25) आणि सोमवार (ता.26) ही यात्रा जिल्ह्यातून जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 25 ऑगस्टला दुपारी 12 वाजता शिर्डीला आगमन होणार आहे. त्यानंतर विखे कुटुंबीयांना सात्वनपर भेट देणार आहे. अकोले, संगमनेर, राहुरी त्यानंतर नगर येथे सायकांळी 7 वाजता शहरातील गांधी मैदान येथे सभा होणार आहे. शासकीय विश्रामगृहावर मुख्यमंत्र्यांचा मुक्काम होईल. 26 ऑगस्टला सकाळी 9.30 वाजता पत्रकारांशी बोलणार आहे. त्यानंतर पाथर्डी, जामखेड येथे सभा होणार आहे. ठिकठिकाणी रॅली, स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेसंदर्भात अनेकांचे प्रवेश होणार आहे. प्रवेशासंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय होईल. या यात्रेचा दोन्हीही पक्षाला फायदा होणार आहे. राज्यात महायुतीचेच सरकार येईल,'' असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. 

मुख्यमंत्री मांडणार विकासाचा लेखाजोखा 
महाजनादेश यात्रा रविवारी जिल्ह्यात येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे गेल्या पाच वर्षांत सरकारने जी काही विकासाची कामे केली आहे, त्याचा लेखाजोखा या यात्रेत मांडणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी 160 जणांची टीम राहणार आहे. 

नावंदे यांच्यावर लवकरच पुढील कारवाई 
"जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या क्रीडा संघटना, खेळाडू आदींकडून अनेकदा तक्रारी दाखल झाल्या होत्या. यासंदर्भात अहवालही प्राप्त झाला आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. आता यापुढील कारवाई लवकरच करण्यात येणार आहे,'' असे शिंदे यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT