ram mandir.jpg
ram mandir.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत प्रथमच भक्तांविना रामनवमी साजरी 

सकाळवृत्तसेवा

सांगली-एक वचनी..एक वाणी..मर्यादा पुरूषोत्तम श्री रामाचा जन्मोत्सव अर्थात रामनवमी सांगली परिसरात भक्तांविनाच साजरी करण्यात आली. येथील राम मंदिर चौक परिसरातील राम मंदिरात जन्मोत्सव सोहळा पुजारी आणि मोजक्‍या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. प्रतिवर्षी राम नवमीला चौकात दर्शनासाठी रांग लागल्याचे चित्र दिसते. परंतू "कोरोना' चे सावट असल्यामुळे परिसरातून जाणारे भक्त लांबूनच नमस्कार करून पुढे जात होते. 
"कोरोना' चे सावट असल्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व यात्रा, जत्रा आणि उरूस साजरे करण्यास बंदी घातली आहे. तसेच सांगली परिसरातील सर्व मंदिरे भक्तांसाठी बंद करण्यात आली आहेत. संचारबंदी लागू असल्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता इतरांना घरातून बाहेर पडण्यास मनाई केली आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा रोखण्यात आल्या आहेत. मंदिरे बंद असल्यामुळे तेथील पुजारीच पूजा-अर्चा करण्यासाठी उपस्थित राहतात. आज राम नवमीवर देखील "कोरोना' चे सावट असल्याचे चित्र दिसून आले. 
सांगलीतील राम मंदिर परिसरातील जुने मंदिर म्हणजे रामभक्तांचे श्रद्धास्थान आहे. राम नवमीला तेथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. राम मंदिर रिक्षा मित्र मंडळाच्यावतीने देखील महाप्रसादाचे आयोजन केले जाते. श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागल्याचे चित्र पहायला मिळते. तसेच मंदिराजवळ श्रीरामाची भव्य कमान देखील उभारली जाते. परंतू आज राम नवमीला मंदिराचे पुजारी आणि मोजके भाविक यांच्या उपस्थितीतच जन्मकाळ सोहळा रंगला. त्यानंतर दिवसभरात मोजक्‍याच भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. "कोरोना' चे सावट असल्यामुळे भक्तांविना रामनवमी साजरी केल्याचे चित्र येथे दिसले. सांगली शहराबरोबरच ग्रामीण भागात साजरा होणारा राम जन्मोत्सव सोहळा यंदा दिसला नाही. अनेकांनी सोशल मिडियावरूनच एकमेकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोनाच्या संकटात लढण्याची आणि सर्वांना वाचवण्याची शक्ती मिळू दे अशी प्रार्थना केली. 

दीपोत्सवाचे आवाहन- 
राम नवमीच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता प्रत्येक कुटुंबाने आपल्या घराबाहेर तसेच संरक्षक भिंतीवर दिवे लावून त्यामध्ये कापूरची पावडर टाकून वातावरण शुद्ध आणि पवित्र करावे. तसेच सर्वांच्या दिर्घायुष्यासाठक्ष प्रभू श्रीरामाला साकडे घालू असे आवाहन देखील सोशल मिडियावरून केल्याचे दिसले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT