Rangala Kalagitura in Parner Nagar Panchayat 
पश्चिम महाराष्ट्र

पारनेर नगरपंचायतीत रंगाला कलगीतुरा 

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : मागील सभेच्या इतिवृत्तावरून आज नगरपंचायतीत विरोधी नगरसेवक व नगराध्यक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. नगराध्यक्षांनीच इतिवृत्त गायब केल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर नगरपंचायतीतच इतिवृत्त असल्याचे नगराध्यक्षांचे म्हणणे होते. तसेच नगराध्यक्षांमुळे नगरपंचायतीचा मोठा विकास निधी पडून असून, तो मागे जाण्याची भीती असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, विरोधकच विकासकामांना विरोध करीत असल्याचा आरोप नगराध्यक्षांनी केला. त्यामुळे नगरपंचायतीत आज आरोप-प्रत्यारोप रंगले होते.

नगरपंचायतीच्या मागील सभेचे इतिवृत्त आज विरोधी नगरसेवकांनी मागितले. मात्र, ते न मिळाल्याने इतिवृत्तच गायब झाल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी नगरपंचायतीत ठिय्या दिला. नंतर हे इतिवृत्त नगराध्यक्ष वर्षा नगरे यांच्या कार्यालयातच आढळून आले. ते अंतिम झालेले नव्हते. इतिवृत्त त्वरित अंतिम करून त्याच्या छायांकित प्रती देण्याच्या मागणीसाठी नगरसेवक आक्रमक झाले. 
मार्चअखेर निधी खर्च करण्यावर चर्चा झाली. रस्ता कॉंक्रिटीकरण, गटार, शिवरस्ता डांबरीकरण, सेनापती बापट तलाव रस्ता कॉंक्रिटीकरण, सोबलेवाडी ते बुगेवाडी रस्ता डांबरीकरणासाठी सुमारे 75 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. 

माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे म्हणाले, की नगराध्यक्षांनी इतिवृत्त गायब केले. भाजी मार्केट, मटण मार्केटचे काम केलेल्या ठेकेदारांचे बिल न दिल्याने कामकाज ठप्प झाले. हा निधी मागे जाण्याची शक्‍यता आहे.नगराध्यक्षांनी जनतेला वेठीस धरू नये, अशी मागणी नगरसेवकांनी केली. चेडे यांच्यासह नगरसेवक नंदकुमार देशमुख, सुरेखा भालेकर, विशाल शिंदे, नंदकुमार औटी, विजय वाघमारे, मालन शिंदे, संगीता औटी आदी उपस्थित होते. 

नगराध्यक्षांनी इतिवृत्त सात दिवसांत अंतिम करणे गरजेचे आहे. नगराध्यक्षांनी इतिवृत्त पाहण्यासाठी नेले होते. बैठकीत मंजूर केलेले विषय अंतिम करण्यासाठी इतिवृत्त महत्त्वाचे आहे. काही नगरसेवकांनी मागणी केल्यावर नगराध्यक्षांनी ते आज दिले. 
- डॉ. सुनीता कुमावत, मुख्याधिकारी 

विरोधी नगरसेवकच विविध विकासकामांना विरोध करीत आहेत. मागील सभेत त्यांनी अनेक विकासकामांना विरोध केला. त्यांनी विरोध केलेल्या विकासकामांची यादी लवकरच जाहीर करणार आहे. 
- वर्षा नगरे, नगराध्यक्ष  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

Pune Accident: पुण्यातील तिघांचा अपघातात मृत्यू; एकजण गंभीर, पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ भीषण धडक, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिवनिका संस्थानमधील ट्रस्टींचीही तपासणी होणार

महाकुंभामध्ये व्हायरल झालेली मोनालिसा भोसलेला जीवे मारण्याच्या धमक्या; व्हिडिओ शेअर करत मदतीची विनंती

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

SCROLL FOR NEXT