rani chennamma express run on 31 st january date postponed in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

राणी चन्नमा एक्सप्रेस धावणार आता 31 जानेवारीपर्यंत

सतीश जाधव

बेळगाव : राणी चन्नमा एक्‍सप्रेस कोल्हापूर ते बंगळूर ऐवजी मिरज ते बेंगळुरू दरम्यान धावत आहे. लॉकडाऊन नंतर प्रयोगिक तत्वावर 7 डिसेंबरपासून 17 डिसेंबरपर्यंत ही रेल्वे धावणार होती. रेल्वे बंद झाल्यास अनेक प्रवाशांना अडचणी येणार होत्या, या संबधी 'सकाळ' मध्ये बातमी प्रसिद्ध होताच रेल्वेचा कालावधी दीड महिन्यांनी वाढविला आहे, आता ही रेल्वे 31 जानेवारीपर्यंत धावणार आहे. यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

राणी चन्नमा एक्स्प्रेस संबंधी 14 डिसेंबर रोजी 'सकाळ' मध्ये 'चन्नम्मा एक्‍सप्रेस निरंतर सुरु ठेवा' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. याची दखल घेत रेल्वेचा कालावधी वाढवला आहे. राणी चन्नम्मा एक्स्प्रेस लॉकडाऊनमुळे 24 मार्च पासून बंदच होती. प्रवाशांच्या मागणी नंतर ही रेल्वे सुरू करण्यात आली होती. मात्र कालावधी फक्त 8 दिवसांचा होता. त्यामळे प्रवासाचे पुन्हा हाल होणार होते, यासंबंधी सकाळमध्ये बातमी प्रसिद्ध होताच कालावधीत वाढ करण्यात आली आहे.  

राणी चन्नम्मा बंगळूर-मिरज-बंगळूर डेली एक्‍स्प्रेस स्पेशल बंगळूरहून 7  डिसेंबरपासून धावत आहे. मिरजेहून दुपारी 3.45 वाजता ही गाडी निघते. उगार खुर्द, कुडची, चिंचली, रायबाग, चिक्‍कोडी, घटप्रभा, गोकाक, पाच्छापूरमार्गे बेळगावला सायंकाळी 6.40 वाजता पोचते. तर लोंढा, अळणावर, दावणगेरी, तुमकुर, यशवंतपूरमार्गे बंगळूरला दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पोचते.

बंगळूरहून रात्री 9.15 वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 8.25 वाजता बेळगावला पोचते. तर दुपारी 12 वाजता मिरज स्थानकावर पोचते. उगार, गोकाक आदी भागातील  स्थानकांवर थांबणारी ही एकमेव गाडी आहे. रेल्वेचा कालावधी वाढल्याने प्रवाशांमधुन समाधान होत आहे.


एलटिटीही धावणार 31 पर्यंत 

हुबळी ते मुंबई पर्यंत धावणारी मुंबई टिळक टर्मिनल (एलटिटी) 31 डिसेंम्बर पर्यंत धावणार होती. या रेल्वेच्या कालावधीतही वाढ करण्यात आली असून ही रेल्वे ही 31 जानेवारीपर्यंत धावणार आहे.

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT