पश्चिम महाराष्ट्र

अदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार; शिवसेनेच्या माजी महापौरांसह 09 जणांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

नगर : नगर शहराचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह नऊ जणांनी एक आदिवासी महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाला. शनिवारी रात्री उशिरा पीडित महिलेने ठाण्यात फिर्याद दिली.

माजी महापौर भगवान फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, महेश फुलसौंदर, अरुण फुलसौंदर ( सर्व रा. बुरूडगाव रोड, नगर) यांच्यासह अन्य पाच जणांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. दोन्ही कुटुंबामध्ये जागेचा वाद सुरू असल्याचे समजते. सोमवरी (ता. १२) रोजी सायंकाळी बुरुडगाव येथील पडीक शेतात पीडित महिला शेळ्या चारण्यासाठी गेली होती. त्यावेळी वरील आरोपी संगनमत करून तेथे गेले. तुला व तुझे कुटुंबियांना आमचे सोबत असलेला जागेचा वाद मिटवायाचा आहे की नाही? असे म्हणून आरोपी यांनी पीडितेला लाकडी दांडक्याने मारहाण केली.

पीडित महिला बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी बलात्कार केला. अन्य लोकांनी घेराव घातला. पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यास ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल केला.

दरम्यान, माजी महापौर भगवान फुलसौंदर आणि अन्य लोकांविरुद्ध जागेच्या वादातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान फुलसौंदर हे नगर शहराचे प्रथम महापौर होते. त्यांचे सामाजिक काम मोठे असून समाजामध्ये एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक साहेबांनी विशेष लक्ष घालून या गुन्ह्याचा तपास करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT