rape on minor girl in kolhapur gargoti.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

...आणि 'ती' परतताच नराधमांनी साधली वेळ

सकाळ वृत्तसेवा

गारगोटी (कोल्हापूर) : डोळ्यांवर स्प्रे मारत अल्पवयीन मुलीचे मोटारसायकलीवरून अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात दोघांवर आज गुन्हा दाखल झाला. यातील मुख्य संशयित पळून गेला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दुसऱ्या संशयितास पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी मुख्य संशयित सचिन अशोक शिंदे (रा. गारगोटी) याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले, की काल सकाळी एक अल्पवयीन मुलगी आपल्या आजीच्या घरी चालत निघाली होती. त्यावेळी तिला सचिनने रस्त्यात अडविले व तिची ओढणी ओढली. लोकांची चाहूल लागताच तो तेथून पळून गेला. थोड्या वेळानंतर हीच अल्पवयीन मुलगी आजीच्या घरातून परतत असताना सचिनने अन्य एकाच्या मदतीने तिच्या डोळ्यांवर स्प्रे मारून तिला जबरदस्तीने मोटासायकलवरून पळवून एका घरामध्ये नेले. तेथे सचिनने तिच्यावर बलात्कार केला. 

याची माहिती मिळताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे स्त्रीरोग तज्ज्ञ उपस्थित नसल्याने मुलीस कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात नेले. यानंतर पुन्हा उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिस निरीक्षक संजय पतंगे, पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, हेडकॉन्स्टेबल संजय गुरव, संतोष भांदिगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी पोक्‍सो कायद्यांतर्गत संशयित दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी अंगद जाधवर यांनी भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली व तपासाच्या सूचना केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

IND vs SL 1st Test: लोकेश राहुलची पहिल्या कसोटीतून माघार? दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास विलंब; नेमकं काय घडलं?

ICC 2027 World Cup Date: गांधी जयंतीला सुरू होतोय वर्ल्ड कप अन् फायनल...! नवीन फॉरमॅट, नवीन चुरस; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT