rape and after murderd 
पश्चिम महाराष्ट्र

बलात्कार... मग तिच्या वडिलांना दगडाने ठेचून मारले

सकाळ वृत्तसेवा

शेवगाव : बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून पीडित मुलीच्या वडिलांची चाकूने भोसकून व दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सोनविहीर (ता. शेवगाव) येथे काल (शुक्रवारी) रात्री घडली. आरोपींमध्ये मृताचा सख्खा भाऊ आणि दोन नातेवाइकांचा समावेश आहे. मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात मृताचा भाऊ आणि विकास फुलसिंग भोसले, रवी फुलसिंग भोसले (दोघे रा. मोरेचिंचोरे, ता. नेवासे) या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

तिच्याशी करायचं होतं लग्न
फिर्यादीत म्हटले आहे, की माझ्या पतीला पहिल्या पत्नीपासून चार मुले आहेत. माझी मुलगी नातेवाईक विकास भोसले यांच्या घरी पाहुणी म्हणून गेली असता विकासने तिच्यासोबत लग्नासारखे संबंध ठेवले. त्यामुळे मागील महिन्यात आम्ही विकास भोसले, रवी भोसले व त्यांचे इतर नातेवाईक यांच्याविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली. त्याचा राग धरून विकास भोसले, रवी भोसले व माझा दीर हे माझ्या पतीसोबत नेहमी भांडण करीत होते. पंधरा दिवसांपासून विकास व रवी हे दिराच्या घरी येऊन राहत होते. "आपण नातेवाईक असूनही आमच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तुझी मुलगी मला देऊन टाक. मी तिच्याशी लग्न करणार आहे,' असे विकास म्हणत होता. मात्र, त्यास आम्ही नकार देत होतो. 

फिर्याद दिल्याचा राग होता
शुक्रवारी रात्री माझे पती मुलांसह जेवण करत असताना दीर घरी आला व पतीसोबत भांडण करू लागला. थोड्या वेळाने रवी व विकास हेही हातात कुऱ्हाड, चाकू व बांबू घेऊन आले. "आमच्यावर गुन्हा दाखल करतोस काय, तुला मारून टाकतो,' असे म्हणत रवीने पतीच्या छातीत सुरा खुपसला. पती ओरडत बाहेर पळाले. त्याच वेळी दिराने डोक्‍यावर वार केला. विकासने हातातील बांबूने दोन्ही पायांवर मारले. पती शेजारी राहत असलेल्या सुनील बाबूराव अवचिते यांच्या घराकडे पळाले. दीर, रवी, विकास यांनी पाठलाग करून त्यांना पाडले व दगड उचलून त्याच्या पायावर टाकला. विकासने पुन्हा पतीच्या छातीवर सुरा खुपसला. आम्ही आरडाओरडा केल्याने तिघेही पळून गेले. नंतर जखमी अवस्थेत पतीला शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. 


दरम्यान, आरोपी पसार झाले असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत आज ठाकरेंचा मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही सहभागाची शक्यता

Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Horoscope 2027: २०२७ ठरणार खास! नोकरी, व्यवसाय अन् पैशांच्या बाबतीत मिळू शकतात मोठ्या संधी; ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार म्हणे

Sunetra Pawar: ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, अजितदादांचं नाव वापरू नका’; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना टोला

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

SCROLL FOR NEXT