bhigwan
bhigwan 
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रीय एकता दिन विविध उपक्रमांनी साजरा 

प्रशांत चवरे

भिगवण - सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन भिगवण व परिसरामध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. एकदा दिनानिमित्त एकदा दौड, शपथ, लघुपट दाखविणे आदी उपक्रम घेण्यात आले.

येथील भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने "रन फॉर युनिटी" या उपक्रमाअंतर्गत बस स्थानक ते मल्लीनाथ मठ दरम्यान एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव गायकवाड, तेजस देवकाते, अजिंक्य माडगे, उपसरपंच जयदीप जाधव, भिगवण पतसंस्थेचे उपाध्यक्ष रणजित भोंगळे, भाजपचे माऊली मारकड, राजेंद्र जमदाडे, रोटरी क्लबचे सचिन बोगावत, कमलेश गांधी, सायकल क्लब संपत बंडगर, केशव भापकर, नेचर फाऊंडेशन संजय चौधऱी, नामदेव कुदळे आदीसह संघटनाच्या प्रतिनिधींनी एकता दौडमध्ये सहभाग घेतला. निळकंठ राठोड म्हणाले, समाजामध्ये एकता प्रस्थापित व्हावा या हेतुने या दौडचे आयोजन करण्यात आले होते. समाजिक व राजकिय संघटनाच्या प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेऊन उपक्रम यशस्वी केला.

येथील कला महाविदयालयांमध्येही राष्ट्रीय एकता दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी माजी सभापती रमेश जाधव, प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, मंडल अधिकारी मकरंद तांबडे, गावकामगार तलाठी धनंजय गाडेकर, महादेव भारती, प्रदीप ताटे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेंद्र शिरसट यांनी विदयार्थ्यांना राष्ट्रीय एकातेची शपथ दिली. सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन चरित्रावर आधारीत लघुपट दाखविण्यात आला. रमेश जाधव, धनंजय गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांनी केले सुत्रसंचालन प्रा. शाम सातार्ले यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत चवरे यांनी मानले.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: दुसऱ्याच षटकात गुजरातला मोठा धक्का; सिराजने बेंगळुरूला मिळवून दिली पहिली विकेट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT