पश्चिम महाराष्ट्र

‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी रवींद्र आपटे

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर -‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक रवींद्र आपटे यांची निवड करण्यात आली आहे आहे. विश्वास पाटील यांच्या राजीनाम्यानंतर नूतन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम गोकुळशिरगाव कार्यालयात आज झाला. 

अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक रवींद्र आपटे यांची निवड निश्‍चित मानली जात होती पण युवा संचालक धैर्यशील देसाई यांच्यासह  अरुण डोंगळे, रणजितसिंह पाटील यांची नावेही चर्चेत होती.  

विश्वास पाटील यांना नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार पी. एन. पाटील यांनी पावणेचार वर्षे काम करण्याची संधी दिली. यापूर्वी संचालकांना दोन ते अडीच वर्षे अध्यक्षपदावर राहण्याची संधी मिळत होती. मात्र, विश्‍वास पाटील हे संघाच्या दोन्ही नेत्यांचे विश्वासू मानले जातात, यामुळेच त्यांना मोठी टर्म मिळाली. 

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून पाटील यांना बदलावे, यासाठी संचालकांचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. मात्र, पाटील यांनी त्याला दाद दिली नाही. संचालकांनी वारंवार नेत्यांकडे अध्यक्ष पाटील यांना बदलण्याची मागणी केली होती, तरी देखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा विचार करून पाटील यांच्या राजीनाम्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. संघाचे नेते विश्‍वास पाटील यांचा राजीनामा घेत नसल्याने संचालक अस्वस्थ होते. अखेर यातील बहुतांश संचालकांनी माजी आमदार महाडिक यांची भेट घेत श्री. पाटील यांना बदलण्याची मागणी केली. जर त्यांना बदलले नाही तर संघाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा संचालकांनी दिला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. 

संचालकांनी केलेल्या बंडाचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे संघाच्या नेत्यांनी तत्काळ संचालकांची बैठक घेण्याचे जाहीर केले. बैठकीत पाटील यांनी राजीनामा देण्याचे आदेश नेत्यांकडून देण्यात आले. अध्यक्ष पाटील यांनी १ जानेवारीला राजीनामा सादर केला होता. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

Latest Marathi News Live Update : केरळमध्ये हत्तीच्या हल्ल्यात मल्याळम वृत्तवाहिनीचा कॅमेरामन ठार

SCROLL FOR NEXT