shi.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरच्या पर्यटन विकासासाठी मास्टर प्लान तयार 

परशुराम कोकणे

सोलापूर : सोलापूरच्या पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यात अक्कलकोट, पंढरपूर, सोलापूर परिसरातील तीर्थस्थळांसह इतर पर्यटन स्थळांचा समावेश आहे. पुढच्या 10 वर्षांत याची अंमलबजावणी होऊ शकेल, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) विभागीय व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले. 

पर्यटन दिनाच्या निमित्ताने "सकाळ'ने एमटीडीसीचे विभागीय व्यवस्थापक हरणे यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ""सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी बनवलेल्या मास्टर प्लान अंतर्गत काही कामे पर्यटन विकास महामंडळ, महापालिका, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग यांच्याकडून करून घेण्यात येणार आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सोलापूरच्या संभाजी तलावाच्या सुशोभीकरणासाठी एमटीडीसीकडून साडेतीन कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, निवडणुकीनंतर या कामाला वेग येईल. हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये काही सुविधा उपलब्ध केल्या आहेत.'' 

"यापूर्वी एमटीडीसीकडून सोलापूर सर्किटचा 43 करोडचा आराखडा मंजूर झाला होता. त्याअंतर्गत एमटीडीसीने जिल्ह्यात विविध कामे केली आहेत. अक्कलकोट येथे रिसॉर्ट बांधले आहे. मल्टिपर्पज हॉलही उभारला आहे. तेथील गटारीच्या प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्या ठिकाणी पार्किंगची चांगली व्यवस्था केली आहे. सिद्धेश्‍वर तलावाच्या सुशोभीकरणाचीही काही कामे एमटीडीसीच्या माध्यमातून केली आहेत. पंढरपुरात मोठ्या संख्येने टॉयलेट, हॉल उभारले आहेत. पर्यटकांच्या मुक्कामाची सोय केली आहे. तसेच पार्किंगची व्यवस्थाही सुधारली आहे. तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर येथे एमटीडीसीने माहिती फलक लावले आहेत,'' असेही हरणे यांनी सांगितले. 

गेल्या चार-पाच वर्षांत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने सोलापूर जिल्ह्यात जवळपास 30 कोटींची कामे केली आहेत. भविष्यात पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. पुढच्या 10 वर्षांत याची अंमलबजावणी होईल. एमटीडीसीसोबतच आता डायरेक्‍टर ऑफ टुरिझम यांच्या माध्यमातून पर्यटन विकासाच्या कामाला गती दिली जाणार आहे. - दीपक हरणे, विभागीय व्यवस्थापक, एमटीडीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT